तरुण भारत

आततायीपणा करणे योग्य आहे का?

कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून बेजबाबदारपणे वागणे ही धोक्मयाची घंटा : नागरिकांनी विचार करण्याची गरज

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मात्र, व्यापारी असोत किंवा ग्राहक त्यांना याबाबत कोणतेच गांभीर्य नसल्याचे बेळगाव बाजारपेठेत दिसून येत आहे. सगळय़ाच व्यापाऱयांना किंवा ग्राहकांना दोष देता येत नाही. मात्र, काही जणांमुळे सर्वांना कोरोनाच्या महामारीला बळी पडावे लागत आहे. गणपत गल्ली येथील कापड दुकान एका महिलेने उघडले. त्यावेळी त्या तरुणीला पोलिसांनी दुकान बंद कर म्हणून सांगितले. तरीदेखील तिने वाद घातला. यामुळे पोलिसांनी चांगलाच दम त्या तरुणीला दिला आहे.

सरकारने सर्वसामान्य जनतेचे हाल होऊ नयेत, यासाठी सकाळी 8 ते 12 पर्यंत अत्यावश्यक दुकाने सुरू करण्यास मुभा दिली. मात्र, मुभा दिली म्हणून कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून अशाप्रकारे बेजबाबदार वागणे ही संपूर्ण बेळगाववासियांना धोक्मयाची घंटा आहे. जणू उद्या काहीच मिळणार नाही म्हणून अक्षरशः खरेदी करण्यासाठी झुंबड उडत आहे. खरोखरच हे योग्य आहे का? याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सध्याची ही वेळ एकमेकांवर टीका करणे किंवा एकमेकाला दोष देण्यात वेळ घालविण्याची नाही. प्रत्येकाने स्वतःच नियम पाळणे गरजेचे आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानांना सोडून इतर दुकानांना परवानगी दिली नसतानाही दुकाने उघडून व्यवसाय करणे कितपत योग्य आहे, याचा विचार कोठे तरी होणे गरजेचे आहे. पोलीस रात्रंदिवस काम करत आहेत. त्यांना सहकार्य करणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येकाची परिस्थिती अडचणीचीच आहे. व्यवसाय नसल्यामुळे सारेजण अडचणीत आले आहेत. ही गोष्ट साऱयांनाच मान्य आहे. मात्र, व्यवसाय करताना प्रथम आपल्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

कोरोना संक्रमणाच्या बाबतीत जिल्हा प्रशासन किंवा विविध संघ-संस्थांनी जनजागृती केली आहे. सोशल मीडियावर तर कोरोनाबाबतच अधिक बातम्या प्रसिद्ध होतात. असे असतानाही आपण आततायीपणा करणे योग्य आहे का? याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.

गणपत गल्लीतील प्रकारामुळे संताप

गणपत गल्ली येथील त्या प्रकारामुळे पोलिसांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर त्या तरुणीने दुकान बंद केले. मात्र, पोलिसांबरोबर अशाप्रकारे हुज्जत घालणे योग्य नाही. महत्त्वाचे म्हणजे अत्यावश्यक सेवा देण्यासाठी ज्या व्यावसायिकांना मुभा देण्यात आली आहे तेही सध्याच्या परिस्थितीवरून दोषी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण कोणताही सोशल डिस्टन्स ते पाळत नाहीत. ग्राहकाला समजावत नाहीत आणि ग्राहक समजून घेत नाहीत. हा जो प्रकार चालला आहे तो अत्यंत धोकादायक आहे.

गेल्या वर्षभरापासून व्यावसायिक, उद्योजक, नोकरदार अडचणीत आले आहेत, यात वादच नाही. पण कोरोनासारख्या महामारीला लढा देताना प्रत्येकाने आवर घालणे गरजेचे आहे. कारण आज जगलो तरच उद्या आम्ही नव्याने व्यवसाय उभे करू किंवा नोकरी पत्करू. पण जगलोच नाही तर जे आपण मिळवत आहे त्याचा उपयोग काय? याचा विचार कोठे तरी होणे गरजेचे आहे. अनेकजण म्हणतात आम्ही कर्जे काढली आहेत, कर्जे कशी फेडायची. पण कर्जे फेडायची असतील तर आपल्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

व्यावसायिकांनी दक्षता घेणे गरजेचे

सध्याची परिस्थिती पाहता बाजारपेठेतील व इतर भागातील व्यावसायिकांनी कोरोनाबाबत अत्यंत दक्षता घेणे गरजेचे आहे. सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत शासनाने मुभा दिली आहे. मात्र, या दिलेल्या सवलतीचा दुरुपयोग होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दररोज बेळगाव जिल्हय़ात 700 हून अधिक रुग्ण कोरोनाबाधित सापडत आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास सरकारने पूर्ण लॉकडाऊन केले तर पुढे कसे? तेव्हा दुसऱयाला सूचना करण्यापेक्षा स्वतःच नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांकडून व्यक्त होत
आहे.

सद्यपरिस्थितीचा विचार करा

दरम्यान, कोरोनामुळे काही कुटुंबे भयानक अडचणीत आली आहेत. काही कुटुंबे संपूर्णपणे उद्ध्वस्तही झाली आहेत. अनेकांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील कोरोनाने चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तेव्हा याचा कोठे तरी प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आली आहे. जगलो तर कोणतीही लढाई लढू शकतो. मात्र, जगलोच नाही तर याचा विचार व्हावा, असे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे.

Related Stories

बिजगर्णीत शुक्रवारी भव्य कुस्ती मैदान

Amit Kulkarni

एलआयसी-लोकमान्य सोसायटी कराराचे नुतनीकरण

Amit Kulkarni

कर्नाटक: माजी मंत्री जनार्दन पुजारी यांची कोरोनावर मात

Shankar_P

उचगाव मळेकरणी यात्रा आजपासून बंद

Amit Kulkarni

अखिल भारतीय ढोर कक्कय्या महिला मंडळाची बैठक

Amit Kulkarni

बाळासाहेब पाटील यांना आंतरराज्य पुरस्कार

Patil_p
error: Content is protected !!