तरुण भारत

कोरोना लस घेतानाच नियमांची पायमल्ली

लसीच्या तुटवडय़ाने जनता वैतागली : ज्येष्ट नागरिक लस घेण्यासाठी दोन-तीन तास ताटकळत : नागरिकांतून नाराजी

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून ज्येष्ट  नागरिक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. ऑनलाईनद्वारे नावे नोंदवून ते लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर ठिकाणी जात आहेत. मात्र, त्या ठिकाणी लस उपलब्ध नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत औषध नियंत्रणाधिकाऱयांशी संपर्क साधला असता जिल्हा आरोग्याधिकाऱयांशी संपर्क साधा, असे ते सांगत आहेत. जिल्हा आरोग्याधिकाऱयांचा मोबाईल बंद आहे. कोरोनासारख्या महामारीत या बेजबाबदारपणावरून बेळगावची आरोग्य व्यवस्था कोमात गेल्याचे दिसून येत आहे.

याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या. वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तब्बल तीन तास लांबच्या लांब रांगा लावून ज्ये÷ नागरिक ताटकळत थांबले. त्यानंतर लसीचा पुरवठा कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बैठक घेऊन अधिकाऱयांना लस मोहीम तीव्रगतीने राबवा, अशी सूचना केली होती. मात्र, हे अधिकारीच उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे प्रकार करत आहेत.

या प्रकारावरून बेळगावला कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘कोरोना जोमात आरोग्य व्यवस्था कोमात, आमचे जीवन आता रामभरोसे’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अक्षरशः तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. आणीबाणीच्या काळात कोणीच पुढे येत नाही. यामुळे सर्व व्यवस्थेबद्दलच तीव्र संताप व्यक्त होत असून कधी उदेक होईल हे कोणालाच सांगता येणार नाही.

कोरोनामुळे जनता तणावाखाली आहे. या तणावाच्या काळात जनतेकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाही. ऑनलाईद्वारे नोंद करून लस घ्या, असे आवाहन करण्यात आल्यानंतर अनेकांनी त्याची नोंदणी केली. मात्र, सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसच उपलब्ध नाही. यामुळे ज्ये÷ व्यक्तींना रांगेत दोन ते तीन तास थांबूनही माघारी परतावे लागले आहे.

याबाबत तालुका आरोग्याधिकारी संजीव डुमगोळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्हा औषध नियंत्रण अधिकारी रघुरामन यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. मात्र, त्यांनी जिल्हा आरोग्याधिकारी शशिकांत मुन्याळ यांच्याकडे बोट केले. त्यांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता  मोबाईल स्वीच ऑफ आला. आणीबाणीच्या काळामध्ये आरोग्य अधिकाऱयांचाच फोन स्वीच ऑफ येत असल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. सकाळपासूनच ज्ये÷ नागरिक लस घेण्यासाठी रांगेत थांबत आहेत. त्यांना लवकर व्हॅक्सिन मिळत नसल्यामुळे तेथील परिचारिका आणि आशा कार्यकर्त्यांबरोबर वाद घालावा लागत आहे. एकूणच बेळगावमधील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. या प्रकाराकडे आता जिल्हाधिकारी आणि उपपमुख्यमंत्री लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Stories

रस्त्यावरच दुकाने थाटल्याने नंदगड बाजारपेठेत गर्दी

Amit Kulkarni

म्हाळेनट्टीत ‘आमचा गाव आमचा तलाव’ अंतर्गत तलावाची खोदाई

Amit Kulkarni

विश्वशांती संदेश देण्यासाठी शुभम साकेचा बेळगाव-गोवा सायकल प्रवास

Amit Kulkarni

लोकमान्यतर्फे गणेश भक्तांना आरती ऍपची भेट

Rohan_P

बेकायदेशीररीत्या गायींची वाहतूक हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखली

Patil_p

गौंडवाड येथील तरुणी आठ दिवसांपासून बेपत्ता

Rohan_P
error: Content is protected !!