तरुण भारत

शेतकऱयांच्या भाजीपाल्याला योग्य हमीभाव द्या

सर्व्हे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

लॉकडाऊननंतर आता क्लोजडाऊनमुळे भाजीपाल्यासह इतर शेतीमालाच्या दरांमध्ये विक्रमी घसरण झाली आहे. यातच खतांचे दर मात्र भरमसाट वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्य शेतकऱयाला जीवन जगणे कठीण बनले असून सरकारने सर्व्हे करून पीक नुकसानीचा आढावा घ्यावा आणि शेतकऱयांना पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यात आले आहे.

क्लोजडाऊनमुळे बाजारपेठा बंद झाल्या आहेत. शेतकऱयांचा भाजीपाला व इतर उत्पादित माल घेताना होलसेल व्यापारी योग्य दर देत नाहीत. त्यामुळे शेतकऱयांना मोठा फटका बसत आहे. याचबरोबर क्लोजडाऊन असल्यामुळे केवळ चार तासांमध्ये भाजीपाला विकणे अवघड आहे. त्यामुळे शेतकऱयाला हा भाजीपाला शेतातच कुजवून टाकण्याची वेळ आली आहे. कोरोनाचा सर्वात जास्त फटका शेतकऱयाला बसला आहे. तेव्हा पिकांचा सर्व्हे करून शेतकऱयांना एक विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

खतांचे दर अचानकपणे वाढविण्यात आले आहेत. हे वाढविलेले दर शेतकऱयांचे कंबरडे मोडणारे आहेत. यातच डिझेल वाढल्यामुळे ट्रक्टरचे भाडे आणि ट्रक्टरचा खर्चही वाढला आहे तो शेतकऱयांना परवडणारा नाही. तेव्हा याचा खुठे तरी गांभीर्याने विचार करून शेतकऱयांना सरकारने दिलासा द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

अपघातग्रस्त ट्रकमधील 190 पोती साखर पळविली

Patil_p

कॅसलरॉक येथे रेल्वेद्वारे आलेला दारूसाठा जप्त

Patil_p

हलगा, कलईगार गल्ली परिसरात मटका अड्डय़ांवर छापे

Patil_p

अनगोळ भूसंपादनाबाबत पुन्हा एकदा शेतकऱयांशी चर्चा करणार

Patil_p

खानापूर तालुक्यात मुसळधार पाऊस

Patil_p

वैजनाथ देवस्थानची दवणा यात्रा रद्द

Amit Kulkarni
error: Content is protected !!