तरुण भारत

सोमवारी रात्री पुन्हा पावसाने झोडपले

ताशिलदार गल्ली, कपिलेश्वर रेल्वेब्रिज येथील घरांमध्ये शिरले पाणी

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचे जोरदार आगमन झाले. या जोरदार पावसामुळे ताशिलदार गल्ली, कपिलेश्वर ओव्हरब्रिजजवळील घरांमध्ये गटारींचे पाणी शिरले. यामुळे या परिसरातील नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या प्रकारामुळे महापालिका आणि रेल्वे प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या आठ दिवसांपासून दररोज पावसाचे आगमन होत आहे. जोरदार वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट यासह हा वळीव पाऊस कोसळत आहे. दिवसभर उष्मा आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी दमदार पाऊस पडत आहे. वाऱयासह पावसाचे आगमन होत असल्यामुळे विद्युत पुरवठादेखील वारंवार खंडित होताना दिसत आहे.

यावषी वळिवाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र, वळिवाचे आगमन यंदा लवकरच झाल्याने शेतकऱयांना फटका बसला होता. सध्या शहरामध्ये स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे ही कामे बऱयाच काळापासून रेंगाळली आहेत. यातच पावसाचेही रोज आगमन होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य आणि घरांमध्ये घाणेरडे पाणी शिरण्याचा प्रकार वारंवार घडत आहे.

रात्रीच्या वेळीच पावसाचे आगमन होत आहे. यातच ठिकठिकाणांचा वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे घरात शिरलेले पाणी बाहेर काढताना महिलावर्गासह साऱयांचीच तारांबळ उडत आहे. सोमवारी झालेल्या या दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी गटारीतील पाणी घरांमध्ये शिरले होते. याचबरोबर गटारी तुडुंब भरून रस्त्यावरून पाणी वाहताना दिसत होते. कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे याचा ये-जा करणाऱयांना त्रास झाला नसला तरी कामानिमित्त आलेल्या काही जणांना त्या पाण्यामधूनच वाट काढावी लागत होती. जवळपास एक तासाहून अधिक वेळ पाऊस झाल्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचून होते.

Related Stories

अंगणवाडी की मसाज सेंटर ?

Amit Kulkarni

सैन्य भरतीसाठी आलेल्या युवकांना खादीमीनची अल्पोपहाराची व्यवस्था

Patil_p

कणबर्गी येथील गटार बांधकाम पूर्ण करण्याची मागणी

Omkar B

गोकाक तालुक्यात 20 जणांना कोरोना बाधा

Patil_p

अशोक चौकाला जाणारा रस्ता वाहतुकीस बंद

Amit Kulkarni

पॅनकार्ड क्लबमधील रक्कम गुंतवणूकदारांना द्या

Patil_p
error: Content is protected !!