तरुण भारत

शहरातील पाणी पुरवठय़ात आज-उद्या व्यत्यय

प्रतिनिधी / बेळगाव

हिडकल पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सोमवार दि. 3 पासून सुरू करण्यात आले आहे. सदर काम आणखी दोन दिवस चालणार आहे. परिणामी दि. 4 व 5 असे दोन दिवस शहरातील पाणी पुरवठय़ावर परिणाम होणार आहे. यामुळे चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसह शहरातील संपूर्ण भागातील पाणी पुरवठय़ात व्यत्यय येणार आहे.

Advertisements

शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱया हिडकल पाणीपुरवठा योजनेतील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. काही ठिकाणी गळती लागली असून काही ठिकाणी जलवाहिनी बदलण्याची आवश्यकता आहे. सदर काम सोमवारपासून सुरू करण्यात आले. काम पूर्ण होण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. हे काम दि. 4 व 5 असे दोन दिवस करण्यात येणार असल्याने हिडकल जलाशयामधून करण्यात येणारा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प राहणार आहे. त्यामुळे शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा करणे अशक्मय आहे. परिणामी पाणी पुरवठय़ात व्यत्यय येणार असल्याने शहरवासियांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Stories

कोगनोळी चेकपोस्टवर सेवा बजाविणाऱया पोलिसांवर कोरोनाचे सावट

Patil_p

वडिलांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थिनीला आर्थिक मदत

Omkar B

विविध ठिकाणी संभाजी महाराजांना अभिवादन

Amit Kulkarni

बेळगाव शहरासह जिल्हय़ात 31 जणांना कोरोनाची बाधा

Patil_p

सिद्धीविनायक स्पोर्ट्स संघाला अजिंक्यपद

Patil_p

कर्लेत गवत गंजीला आग लागून शेतकऱयाचे 75 हजाराचे नुकसान

Patil_p
error: Content is protected !!