तरुण भारत

बिम्सच्या कारभाराबद्दल तीव्र संताप

अधिकारी-डॉक्टरांवर कारवाई करण्यास टाळाटाळ का? : हॉस्पिटलबाबत तक्रारी वाढल्या

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

बिम्स हॉस्पिटलबद्दल तक्रारी वाढल्या आहेत. मोठय़ा प्रमाणात तक्रारी वाढूनही बिम्सवर कारवाई होत नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. रुग्णाला दाखल करण्यासाठी अक्षरशः हेलपाटे मारावे लागत आहेत. कोरोनामुळे अनेकांना त्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. घरातील व्यक्तींना कोरोना झाला की त्याला दाखल करताना निरोगी व्यक्तीलाही त्याच रुग्णवाहिकेतून घेऊन जाण्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

सोमवारी एका व्यक्तीने पत्नीला कोरोना झाला म्हणून तिला दाखल केले तर आईलाही लक्षणे सापडली. त्यामुळे तिला बेडची व्यवस्था करण्यासाठी त्या तरुणाला हेलपाटा मारावा लागत आहे. बिम्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी निरोगी व्यक्तीलाच मोठा त्रास सहन करावा लागला आहे. या ठिकाणी प्रत्येकाला नरकयातना भोगाव्या लागत आहेत. बिम्सच्या वरि÷ अधिकाऱयांचे याकडे लक्षच नाही.

दरम्यान, बिम्सचे कार्यकारी संचालक जिल्हाधिकारी आणि जिल्हा पालकमंत्र्यांच्या बैठकीलाच अनुपस्थित राहतात. प्रादेशिक आयुक्तांनी बोलाविलेल्या बैठकीला ते उपस्थित राहत नाहीत. रुग्णांकडे ते फिरकूनही पाहत नाहीत. असे असताना त्यांना त्या ठिकाणी कशासाठी ठेवण्यात आले आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. यामागचे नेमके गौडबंगाल काय? असा प्रश्नही उपस्थित होताना दिसत आहे.

गोरगरीब जनतेला आणि सामान्य व्यक्तींना उपचार मिळावेत यासाठी सिव्हिल हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी गलेलठ्ठ पगार देऊन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकार करोडो रुपये यासाठी खर्च करत आहे. मात्र सर्वसामान्य जनतेलाच या हॉस्पिटलचा उपयोग होत नसेल तर कशासाठी हा खर्च करायचा? असा प्रश्न पडला आहे.

हॉस्पिटलच्या कारभाराविरोधात अनेकवेळा उदेक झाला आहे. मागील वेळी तर रुग्णवाहिका जाळण्यात आली होती. डॉक्टरांवरही हल्ले झाले आहेत. याला कारण म्हणजे येथील अधिकाऱयांचा आणि डॉक्टरांचा बेजबाबदारपणा असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. या कारभाराबद्दल जिल्हाधिकाऱयांसह पालकमंत्र्यांनी आणि सरकारने लक्ष देऊन संबंधित अधिकारी व डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. सर्वसामान्य जनता नरकयातना भोगत आहे. उपचार मिळत नाहीत म्हणून धडपडत आहे. अनेकांचा मृत्यू होत आहे. अशा वेळी जर या हॉस्पिटलचा उपयोग होत नसेल तर ते हवेच कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक जण आता डॉक्टरांनाच धडा शिकवू, असा इशारा देत आहेत. तेव्हा तातडीने या हॉस्पिटलच्या कारभारामध्ये सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

खानापूर महामार्गावरील निम्म्याहून अधिक हायमास्ट बंद

Amit Kulkarni

लोकशाही मार्गाने सीमालढा सुरूच

Patil_p

शुक्रवारपासून के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीत चित्रप्रदर्शन

Patil_p

अंगडी महाविद्यालयात क्रिएटिव्ह क्लबचे उद्घाटन

Amit Kulkarni

कॅम्प येथील पोलीस हवालदाराचे आजाराने निधन

Patil_p

दुचाकी अपघातात महिला ठार

tarunbharat
error: Content is protected !!