तरुण भारत

स्थलांतरित भाजी मार्केटमध्ये वर्दळ वाढली

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी एपीएमसीतही भाजीमार्केट ठेवून शहरातील तीन ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात भाजी मार्केटची निर्मिती करण्यात आली आहे. या स्थलांतरित भाजी मार्केटमध्ये खरेदी-विक्रीसाठी गाळे उभारण्यात आले आहेत. या गाळय़ांतून भाजीची खरेदी-विक्री सुरू आहे.

Advertisements

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील सीपीएड मैदान, ऑटोनगर व हिंडाल्कोजवळ स्थलांतरित भाजी मार्केट उभारण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱयांना सोयीचे होत असले तरी काही शेतकऱयांना याचा नाहक त्रास होत आहे. रविवारी सीपीएड मैदान व ऑटोनगर येथील भाजी मार्केटला सुरुवात झाली तर हिंडाल्कोजवळील भाजीमार्केटमध्ये सोमवारपासून खरेदी-विक्रीला सुरुवात झाली. त्यामुळे तात्पुरत्या स्थलांतरित भाजीमार्केटमध्ये शेतकऱयांची वर्दळ वाढली आहे.

एपीएमसी भाजीमार्केटमधील गर्दी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून तीन ठिकाणी स्थलांतरित भाजीमार्केटला जिल्हाधिकाऱयांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार शहरातील उत्तर भागात दोन व मध्यवर्ती भागात एक अशी एकूण तीन ठिकाणी भाजीमार्केट सुरू करण्यात आली आहेत. दरम्यान, या ठिकाणी गाळे उभारून भाजी खरेदी-विक्री केली जात आहे. शेतकऱयांनी सामाजिक अंतर राखून या ठिकाणी भाजीपाला आणायचा आहे. या ठिकाणी गर्दी करू नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात शेतीचे क्षेत्र आहे. त्यामुळे उन्हाळय़ात मोठय़ा प्रमाणात भाजीपाला पिकविला जातो. हा भाजीपाला विक्रीसाठी एपीएमसी मार्केटला आणला जातो. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एपीएमसीमधील भाजीमार्केट बंद करण्यात आले आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून शहरातील तीन ठिकाणी स्थलांतरित भाजीमार्केट सुरू करण्यात आली आहेत. या ठिकाणी खरेदी-विक्रीसाठी वर्दळ वाढलेली पाहायला मिळत आहे.

Related Stories

अनगोळ परिसरात डेनेज वाहिन्या घालण्याचे काम त्वरित पूर्ण करा

Patil_p

गुडफ्रायडेनिमित्त विविध चर्चमध्ये प्रार्थना

Amit Kulkarni

वनाधिकारी सुनीता निंबरगी यांना मुख्यमंत्री पदक जाहीर

tarunbharat

हिंडाल्कोजवळ बस चालकाला मारहाण

Patil_p

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता सभा

Amit Kulkarni

वॉर्ड पुनर्रचना-आरक्षण फेरविचार याचिकेवर आज सुनावणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!