तरुण भारत

सांगली जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक १५६८ रूग्ण, मृत्यू ४०

कोरोनामुक्त १२६२ : मनपाक्षेत्रात १५८ तर  ग्रामीण भागात १३१० वाढले

प्रतिनिधी / सांगली

Advertisements

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. सोमवारी एकाच दिवशी जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक असे  नवे एक हजार 568 रूग्ण वाढले तर उच्चांकी 40 जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात 158 तर ग्रामीण भागात तब्बल एक हजार 310 रूग्ण वाढले आहेत. उपचार सुरू असणार एक हजार 262 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचारात 13 हजार 861 रूग्ण आहेत..

मनपाक्षेत्रात 158 रूग्ण वाढले

महापालिका क्षेत्रात सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात दिवसेंदिवस ही रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. सांगली 90 तर मिरज शहरात 68 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 23218 रूग्ण आढळून आले आहेत. उपचारातील रूग्णसंख्येचा आकडा वाढतच चालला आहे.

40 जणांचा मृत्यू

महापालिका क्षेत्रात सांगली शहरात तीन मिरज शहरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. आटपाडी, जत एक, कडेगाव तालुक्यात चार, खानापूर नऊ, मिरज, तासगाव सहा, कवठेमहांकाळ, शिराळा दोन आणि वाळवा तालुक्यात चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

 1262 रूग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यात कोरोनाचे उपचार सुरू असणारे 1262 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्ह्यात 79 हजार 911 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर त्यातील 63 हजार 662 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज लसीकरण होणार नाही

जिल्ह्यात लस उपलब्ध नसल्याने मंगळवारी कोणत्याही लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी दिली आहे.

नवे रूग्ण    1568
उपचारात    13861
बरे झालेले   63662
एकूण       79911
मृत्यू        2388
सोमवारचे बाधित रूग्ण

तालुका       रूग्ण  
आटपाडी    191
कडेगाव      96
खानापूर      224
पलूस        83
तासगाव     163
जत         99
कवठेमहांकाळ 45
मिरज       218
शिराळा      131
वाळवा       160
सांगली शहर   90
मिरज शहर    68
एकूण       1568
आजचे लसीकरण  00
एकूण लसीकरण  563922

Related Stories

शिराळ्यात तेरा हजारांची ऑनलाईन फसवणूक

triratna

ॲट्रॉसिटीचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करा

triratna

मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार – पवार यांना नगरसेवकाने दिली धमकी

triratna

सांगली जिल्ह्यात दोन दिवसांत 377 नवीन रूग्ण वाढले

Shankar_P

सांगली : स्वातंत्र्य दिन मुख्य शासकीय कार्यक्रमाचे फेसबुकच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण

triratna

सांगलीतील तरूणाचा कोरोना वॉर्डमध्ये मृत्यू

triratna
error: Content is protected !!