तरुण भारत

मनपाचे कोविड केअर सेंटर सज्ज

लक्षणे नसलेल्या कोरोना बाधितांसाठी उपयुक्त : सुभाषनगर देवराज अर्स वसतिगृहात व्यवस्था

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून रुग्णालयात गर्दी वाढू लागली आहे. कोरोना बाधितांचा संसर्ग घरातील अन्य सदस्यांनाही होत असल्याने औषधोपचार घेताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे कोरोनाची लक्षणे नसलेल्या कोरोना बाधितांसाठी जिल्हा आरोग्य खाते आणि महापालिकेच्यावतीने कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.

कोरोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात होत असून जलदगतीने होणाऱया आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी क्लोजडाऊन करण्यात आले आहे. तरीही संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. घरातील एक व्यक्ती कोरोनाबाधित झाल्यास अन्य सदस्यांनाही लागण होत आहे. पण लहान घरात रुग्णांना वेगवेगळे ठेवणे अशक्मय आहे. रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याने केवळ गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेण्यात येत आहे. कोरोनाची लक्षणे नसलेल्या बाधितांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. पण त्यांना वेगळे राहणे आवश्यक आहे. मात्र घर लहान असलेल्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे अशा रुग्णांसाठी जिल्हा आरोग्य केंद्र आणि महापालिकेच्यावतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. सुभाषनगर येथील देवराज अर्स विद्यार्थी वसतिगृहात 100 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. एका खोलीमध्ये दोन रुग्णांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी कोरोना बाधितांसाठी आवश्यक सुविधा, जेवणाची सोय तसेच वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱयांचे पथक या ठिकाणी चोवीस तास उपलब्ध राहणार आहे. रुग्णांची स्थिती गंभीर झाल्यास किंवा ऑक्सिजनची गरज भासण्याची शक्मयता असल्याने या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली.

सुभाषनगर येथील देवराज अर्स वसतिगृहामध्ये कोरोना केअर सेंटर सज्ज ठेवण्यात आले असून आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पण अद्याप या ठिकाणी रुग्णांना दाखल करण्यात आले नाही. पण लक्षणे नसलेल्या कोरोना बाधितांसाठी कोविड केअर सेंटर खुले झाले आहे.

Related Stories

महानगरपालिकेचे दरवाजे नागरिकांसाठी बंद!

Patil_p

मुख्यमंत्रीही क्वारंटाईन होण्याची शक्यता

Patil_p

मंगळवारी जिल्हय़ात 219 नवे रुग्ण

Amit Kulkarni

चंद्रशेखर इंडी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Patil_p

साहित्य हा मानवी जीवनाचा सर्जनशील अविष्कार

Patil_p

मराठा स्पोर्ट्स, विघ्नहर्ता अनगोळ, अयोध्या कडोली संघ विजयी

Amit Kulkarni
error: Content is protected !!