तरुण भारत

लॉकडाऊनआधी बारामतीकरांची भाजी मंडईत गर्दी

  • आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून लॉकडाऊनची अंमलबजावणी


ऑनलाईन टीम / बारामती : 


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामती शहरात पुढील सात दिवस कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी आज रात्रीपासून होणार आहे. त्यापूर्वी आज म्हणजेच मंगळवारी सकाळी बारामतीकरांनी भाजी खरेदी करण्यासाठी मंडईमध्ये अलोट गर्दी केली होती. 

Advertisements


दरम्यान, मुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत 7 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यानुसार 4 मे रोजी मध्यरात्री पासून ते 11 मे पर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बारामती तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, वाढत्या रुग्ण संख्येला आटोक्यात आणण्यासाठी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले की, या दरम्यान, सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत केवळ दोन तास फक्त दूध विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. तसेच शहरातील हॉटस्पॉट मधील सर्व आस्थापना ही बंद राहणार आहेत. 

यासोबतच मेडिकल, हॉस्पिटल व्यतिरिक्त कोणीही निष्कारण घराबाहेर पडू नये, असेही सांगण्यात आले आहे. कारण नसताना कोणीही घराबाहेर फिरताना आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 

Related Stories

महे गावात ज्येष्ठ नागरिकांसाठी कलम 24 कायदा असणारा गुन्हा नोंद;करवीर तालुक्यातील पहिलीच घटना

triratna

महाबळेश्वरात संस्थात्मक विलीगीकरण केंद्रात युवकाची आत्महत्या

triratna

सोलापूर ग्रामीण भागात 1 कोरोनाबाधित रुग्णाची भर

triratna

कोल्हापूर : गगनबावड्यात कोरोनाची भीती वाढली

triratna

खेडच्या मीनाताई ठाकरे नाट्यगृहाचा पडदा उघडणार !

Shankar_P

चिमुरडय़ा ओजससाठी तातडीच्या मदतीचे आवाहन

NIKHIL_N
error: Content is protected !!