तरुण भारत

घरी वॅक्सिंग करताना

हातापायांवरील लव काढण्यासाठी वॅक्सिंग केलं जातं. वॅक्सिंगमुळे हात आणि पाय छान स्वच्छही होतात. सध्या ब्युटी पार्लर्स, स्पा सगळं काही बंद असल्यामुळे फेशियल असो किंवा वॅक्सिंग, सगळं काही घरीच करावं लागतं. तुम्हीही घरीच वॅक्सिंग करणार असाल तर या टिप्स उपयोगी पडू शकतील. चुकीच्या पद्धतीने वॅक्सिंग केल्यास त्वचेचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे वॅक्सिंग करताना विशेष काळजी घ्यायला हवी.

  • वॅक्सिंग करण्याआधी त्वचेवर मॉईश्चरायझर, तेल, क्रीम यापैकी काहीही लावू नका. हात आणि पाय साबणाने धुवून, कोरडे करून मगच वॅक्सिंग करा.
  • चुकीच्या दिशेने केलेलं वॅक्सिंगही तापदायक ठरू शकतं. यामुळे त्वचेवर पुरळ उठतं. शिवाय केसांची वाढही उलटय़ा दिशेने होऊ लागते. हे टाळण्यासाठी केसांच्या वाढीच्या दिशेने वॅक्सिंग करा.
  • गरम वॅक्स थेट हातापायांवर लावू नका. गरम वॅक्स आधी कोपरावर किंवा मनगटावर लावून बघा. गरम वॅक्समुळे त्वचा भाजून पुरळ येऊ शकतं. तसंच त्वचेचा रंगही बदलू शकतो.
  • एकाच प्रयत्नात लव निघाली नाही तर वारंवार वॅक्सिंग केलं जातं. अशा पद्धतीने वारंवार वॅक्सिंग केल्यास त्वचा सोलवटू शकते. त्यामुळे उरलेला एखादा केस धाग्याने किंवा प्लकरने काढून टाका.
  • बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्स मिळतात. काही वॅक्स टॅनिंगही दूर करतात.  चॉकलेट, फ्रूट, हॉट वॅक्स, कोल्ड वॅक्स अशा प्रकारांमधून योग्य त्या वॅक्सची निवड करा.

Related Stories

फॉर फेस्टिव्ह लूक

Omkar B

करा चॉकलेटे मॅकओव्हर

Amit Kulkarni

आता जबाबदारी वाढली…

tarunbharat

किती काळ टिकतो सॅनिटायझर?

Omkar B

फेशियल करताय ?

tarunbharat

समंथा करते कठीण योगासनं

Amit Kulkarni
error: Content is protected !!