तरुण भारत

काही चांगलं पण घडतंय…

अचूक बातमी तरुण भारतची, मंगळवार, 4 मे सकाळी 9.00 वाजता

ऑडिओलॉजिस्टने केली कोरोनावर मात

Advertisements

प्रतिनिधी / सातारा :

कोरोना बाधितांच्या संख्येत सातारा तालुक्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असली तरी त्यामधून यशस्वीरित्या मात करणाऱ्यांची संख्या ही तितकीच आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही याचा धोका आहे, पण कित्येक कर्मचारी हे अत्यंत धाडसाने या कोरानाच्या विळाख्यातून मुक्त होऊन पुन्हा त्याच जोमाने आपले कर्तव्य बजाविण्यास दाखल झाले आहेत. यापैकीच एक उदाहरण म्हणजे जिल्हा रूग्णालयात सेवा बजाविणाऱ्या डॉ. जयश्री जगताप, तर त्यांच्याकडून ऐकूया त्यांनी कोरोनावर कशा प्रकारे मात केली.  

मी डॉ. जयश्री जगताप, आम्ही मुळचे सोलापुरचे पण मागील काही वर्षांपासुन आम्ही कामानिमीत्त सातारामध्ये स्थायिक झालो. येथील जिल्हा रूग्णालयात ऑडीओलॉजिस्ट म्हणून सेवा बजावते. आमच्या विभागात बहुतांश पेशंट हे मुकबधीर असतात. सध्या कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने कित्येकदा फक्त पेशंटच उपचारासाठी येतात. त्यामुळे या रूग्णांशी संपर्क साधावयाचा असल्यास त्यांना लिपसिंग (तोंडाचे हावभाव) वरून त्यांच्याशी बोलावे लागते. त्यामुळे कित्येकदा मास्क काढूनच हा संपर्क केला जातो. याच दरम्यान मला कोरोनाची लागण झाली असावी.

कारण एप्रिल महिन्याच्या 4 तारखेला मला अचानक थंडीताप, सर्दी व खोकला जाणवू लागला. तसेच पावडर किंवा परफ्युमचा वासच मला येत नव्हता. त्यामुळे मी पॅरोसिटोमॉलची गोळी घेतली. पण तब्बेतीमध्ये कोणताच फरक जाणवला नाही. त्यामुळे त्वरीत कोरोनासंबंधीची तपासणी करून घेतली. त्याचे रिपोर्ट दुसऱ्या दिवशी आले, त्यामध्ये मी पॉझिटीव्ह निघाले. रिपोर्ट बघून मला धक्काच बसला कारण माझ्य़ा डोळय़ासमोर माझी साडेचार वर्षाची मुलगी दिसू लागली. रिपोर्ट मिळाले त्यादरम्यान मी रूग्णालयात होते. त्वरीत माझे पती उमेश यांना सांगितले की तुमची आणि मुलगी मनस्वी हिची ही तपासणी करून घ्या.
तपासणी दरम्यान माझी मुलगीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह निघाला व पतीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानुसार आता आलेल्या संकटाला तर सामोरे जावेच लागेल या दृष्टीने आम्ही फिजीओस्ट्रेशनचा सल्ला घेऊन औषोधोपचार करून घेण्यास सुरूवात केली.  

आम्ही येथे भाडय़ाच्या घरात रहात असल्याने घरमालकांना सांगून पती उमेश यांच्याकरीता काही दिवसांकरीता एक स्वतंत्र रूम देण्याचा विनंती केली. त्यानुसार ते जवळच्याच एका खोलीत व मी आणि माझी मुलगी आमच्या घरात 14 दिवस क्वॉरंटाईन होतो.  क्वॉरंटाई असताना आम्ही व्हिटॅमीन सीच्या गोळय़ा घेणे, तुळशीपाल्याचा रस, कफ जाणवत असल्याने वाफारा घेणे, तसेच शरिरातील हय़ुमिनीटी पावर वाढण्यासाठी अंडी, चिकन, मटन, लिंबू सारख्या पदार्थांचा समावेश रोजच्या जवेणात केला. तसेच ऑक्सीमीटर व थर्मामिटरने नियमीत तपासणी करून घेतली. शक्य होईल तितकी विश्रांती घेतली, आणि कोरोनावर यशस्विरित्या मी आणि माझ्या मुलीने मात केली. आता मी पुन्हा रूग्णालयात सेवा बजाविण्यास सुरूवात केली आहे.

इतरांना धोका जास्त

मी जिल्हा रूग्णालयातून कोरोना संबंधीच्या दोन्ही ही लसी घेतल्या होत्या, तरी ही मी कोरोना पॉझिटीव्ह निघाले. त्यामुळे मी लस घेतले म्हणजे मला कोरोना होणार नाही हा समज दुरू करावा, कोरोना होणार पण ऑक्सिजनची गरज लागेल इतका त्रास होणार नाही. त्यामुळे लस घेतलेल्यांना धोका जरी कमी असला तरी आपण ज्यांच्या संपर्कात येऊ त्यांना हा धोका जास्त आहे.  

Related Stories

शाहू कलामंदिराचा पडदा उघडणार

Patil_p

सचिन सोनवणे याचा उदयनराजे यांनी केला सन्मान

Patil_p

भय इथले संपत नाही….

Patil_p

गुणवरे येथे 1500वृक्ष लागवडीचा उपक्रम

Patil_p

दिवाळीची लगबग सुरु; काळजी घेण्याची गरज

Patil_p

म्यानमारच्या 14 खासदारांनी घेतलाय भारतात आश्रय?

datta jadhav
error: Content is protected !!