तरुण भारत

वाढ उच्चांकीच, थोडी कमी असल्याचा दिलासा

अचूक बातमी “तरुण भारत” ची, मंगळवार, 4 मे, सकाळी 11.00

● सोमवारी अहवालात 2,059 बाधित ● पॉझिटिव्हिटी रेट वाढताच 40.64 ● कडक लॉकडाऊनला प्रारंभ ● नेमके कोणत्या तालुक्यात किती ? ● सविस्तर अहवाल काही वेळातच ● वाढ रोखण्यासाठी उपाययोजनांची गरज ● लॉकडाऊन मध्ये या गोष्टी सुरु राहतील ● कडक भूमिका घ्याव्या लागतील ● आता लोकांनाही ठरवावे लागेल ● अनेक गावात सुरू झालाय जनता कर्फ्यू

Advertisements

सातारा / प्रतिनिधी :

30 एप्रिल रोजी एकूण वर्षातील 2,494 एवढी उच्चांकी बाधित वाढ नोंदवली गेली. 1 मे त्यादिवशी थोडीशी कमी पण 2,383 उच्चांकी वाढीने मे महिन्याचा आरंभ झाला आहे. तर रविवारी रात्रीच्या अहवालात बाधित वाढीने नवा उच्चांक नोंदवला. तब्बल 2,502 जणांचे अहवाल बाधित आल्याने आता स्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. सोमवारी रात्रीच्या अहवालाने थोडासा दिलासा दिला आहे. 2,059 एक्स एक्स एक्स एवढ्या जणांचा अहवाल बाधित आलाय फक्त नवा उच्चांक नसल्याचा दिलासा लाभला आहे.

कोविड हॉस्पिटलबाहेर रांगा

मोठ्या संख्येने होणारी बाधित वाढ थांबवायची कशी याबाबत आता सर्व जिल्हावासीयांसह प्रशासनाला देखील हातात हात घालून काम करावे लागणार आहे.  हॉस्पिटल्स बाहेर उपचार घेण्यासाठी बाधित रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या रांगा लागत आहेत. तिथे असलेल्या गर्दीच्या चेहऱ्यावर हताश भावना दिसून येत आहे.  कारण बेड मिळत नाहीत. व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन बेड नसल्याने अनेकजण ते मिळण्याची वाट पाहत आहेत. गंभीर स्थितीतील रुग्णांना घेऊन नातेवाईक बेड शोधताहेत. या रुग्णांस व नातेवाईकांना चहा, जेवण देऊन काही सामाजिक संस्था मानवतेचा रथ पुढे ओढण्याचे काम कोणत्याही प्रसिद्धीविना करत आहेत.

लॉकडाऊनमध्ये फक्त हे सुरु राहणार

लॉकडाऊन कडक करण्यात आला असून यामध्ये दूध व मेडिकल सुविधा वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहेत. भाजीपाला, किराणा दुकाने, मटण, चिकन यांना सकाळी 7 ते 11 घरपोच सेवेसाठी परवानगी दिली असली तरी शहरी भागात मुख्याधिकारी व ग्रामीण भागात तहसीलदारांची परवानगी घ्यावी लागणार असून त्यानंतर घरपोच सेवा करणाऱया डिलिव्हरी बॉय यांना पास देण्यात येतील. मेडिकल दुकाने, लॅब, वैद्यकीय सुविधा मागील आदेशानुसार सुरु राहणार आहेत. नवीन आदेशानुसार वाईन शॉप, बिअर, परमीटरुममधून दुपारी 12 ते 5 या वेळेतच घरपोच सेवा देण्यास परवानगी राहणार असून बँका, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, काही खासगी आस्थापना या पूर्वी असलेल्या वेळेनुसार सुरु राहणार असल्याचे प्रभारी जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सायंकाळी स्पष्ट केले आहे.  

पंधरा दिवस कडक लॉकडाऊनची गरज

अनलॉकनंतर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये बेशिस्तपणा वाढला होता. ग्रामपंचायत निवडणुका, लग्नकार्य, आंदोलने आणि इतर ठिकाणी गर्दी केली जात होती. मास्कचा वापरही कमी झाला होता मात्र त्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात बाधित वाढ होत नव्हती आता लॉकडाऊन सुरू असून लोक नियम पाळून घरात बसलेले असताना होणारी बाधित वाढ आणि तीही मोठ्या संख्येने ही अनाकलनीय आहे. मात्र तरीदेखील ज्या पद्धतीने जिल्ह्यात आज स्थिती निर्माण झाली आहे ती सावरायची असेल तर पंधरा दिवस पूर्ण संचारबंदी वैद्यकीय मेडिकल लॅब सुरू राहतील बाकी सर्व व्यवहार बंद ठेवून बाधित वाढ रोखावी लागणार आहे.

सोमवारी 2,059 बाधित मागील दोन-तीन दिवसातील उच्चांकी आकडेवारी नंतर सोमवारी रात्रीच्या अहवालात 2,059 जणांचा अहवाल बाधित आला आहे. या अहवालानुसार एकूण  5 हजार  66 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2,059 जणांचा अहवाल बाधित आलेला असून पॉझिटिव्हिटी रेट 40.64 असा आहे. रविवारी रात्री च्या आवाजात देखील पॉझिटिव्हिटी रेट वाढलेलाच आहे.

बाधित वाढ रोखण्याचे आव्हान

जिल्ह्यात 2 हजारांच्या संख्येने सुरू असलेली बाधित वाढ चिंताजनक ठरू लागली आहे. बाधित वाढीतील उच्चांक, कोरोना बळीच्या आकड्यांमध्ये उच्चांक परिस्थितीचे गांभीर्य वाढवू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्याला सावरण्यासाठी उपाय योजना वाढवून संसर्ग रोखण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा हे निश्चितच. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये लोक स्वतः पुढाकार घेऊन संसर्ग वाढ रोखण्यासाठी प्रयत्न करू लागलेत त्यासाठी अनेक ठिकाणी जनता कर्फ्यू पूर्ण संचारबंदी लोक स्वयंस्फूर्तीने पाळू लागले आहेत.

सोमवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने 5,59,379 एकूण बाधित 1,09,878, घरी सोडण्यात आलेले 86,620, मृत्यू 2,610 उपचारार्थ रुग्ण 20,635   
सोमवारी जिल्हय़ात बाधित 2,502, मुक्त 2,361, बळी 36 

Related Stories

चौपाटी सुरू पण ग्राहकांचा थंड प्रतिसाद

Patil_p

साताऱयात ट्रक अपघातात डांगेघर येथील एकाचा मृत्यू

Patil_p

शेंद्रे ते कागल महामार्गाच्या सहा पदरीकरणास ‘बीओटी’ वर लवकरच सुरूवात…

Patil_p

सातारा सैनिक स्कूल सीबीएससी दहावीचा निकाल १०० टक्के ‌

triratna

सातारा : वकिलांना कौटुंबिक विमा सुरू करण्याची मागणी

datta jadhav

जळकेवाडी पाणी प्रश्न पाच वर्ष अपुर्ण, ग्रामस्थांची ससेहोलपट सुरुच

triratna
error: Content is protected !!