तरुण भारत

अदर पूनावाला धमकी प्रकरणावर संजय राऊत म्हणाले…

मुंबई \ ऑनलाईन टीम

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी आपल्याला धमक्या मिळत असल्याचा खुलासा केला होता. सध्या देशात यावरून चांगलीच खळबळ माजली आहे. अदर पूनावाला यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नसून हे धमकी देणारे नेमके कोण यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपाची मालिका सुरू झाली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातून अशा प्रकारच्या धमक्या त्यांना कोणीही देणार नाही कारण महाराष्ट्राची ती परंपराच नाही अशी प्रितिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, आदर पूनावाला यांनी धमकीबजद्दल काही वक्तव्य केले असेल तर निश्चितच प्रकरण गंभीर आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रातून अशा प्रकारच्या धमक्या त्यांना कोणीही देणार नाही. महाराष्ट्राची ती परंपराच नाही. किंबहुना महाराष्ट्राला सुद्धा या गोष्टीचा गर्व राहील की देशाची आरोग्यविषयक सुरक्षा निर्माण करणारे किंवा देशाला आरोग्यविषयक कवच-कुंडल देणारी जी लस आहे त्याची निर्मिती महाराष्ट्रात होते आहे.ही एक राष्ट्रभक्तीची भावना महाराष्ट्रात कायम राहील. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणतेही नेते, राजकीय पक्ष अशा प्रकारचा धमक्या देणार नाही. जर कोणी असे करत असेल तर केंद्र आणि राज्य सरकाने याचा खोलवर तपास करावा, असे देखील म्हणाले.

अदर पूनावाला यांची सुरक्षा करणं सर्वांची जबाबदारी आहे. ते देशासाठी काम करत असून त्यांची सुरक्षा करणं आपलं कर्तव्य असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.

Related Stories

एअर इंडिया पुन्हा टाटा समूहाकडे येणार?

prashant_c

बाधित रुग्णाच्या कुटुबांची अवहेलना करत असल्याचा तक्रार अर्ज पोलिसात

Patil_p

फुटबॉल हंगामाला ब्रेक : लाखोंची उलाढाल ठप्प

Shankar_P

मराठा आरक्षणासाठी कोडोलीत शांततेच्या मार्गाने रास्ता रोको : दलित महासंघाचा पाठिंबा

Shankar_P

ससा मारणे आले अंगलट 16 हजार रुपयांचा दंड

Patil_p

कोरोनाची धास्ती : अहमदाबादमध्ये आज रात्रीपासून 57 तासांचा कर्फ्यू

pradnya p
error: Content is protected !!