तरुण भारत

मोठी बातमी : कोरोनामुळे आयपीएल स्थगित;बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची घोषणा


नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना आयपीएललाही त्याचा फटका बसला असून स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्याची घोषणा केली आहे. स्पर्धा स्थगित झाल्याने क्रिकेटप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे.

Advertisements

सोमवारी कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बंगळूरसोबत होणारा सामना पुढे ढकलावा लागला. तसेच चेन्नईच्याही तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर मंगळवारी हैदराबादचा वृद्धिमान साहा यालाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. या पार्श्वभूमीवर आयपीएलने स्पर्धेला स्थगिती दिल्याची माहिती दिली आहे.

बायो-बबलमध्येही कोरोनाने घुसखोरी केल्याने आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यातच बीसीसीआय सर्व सामने मुंबईत खेळण्याची तयारी करत होतं. मात्र यादरम्यान हैदराबादच्या वृद्धिमान साहा याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. हैदराबाद आणि मुंबईमध्ये आज दिल्लीत सामना होणार होता. खेळाडूंनाही कोरोनचाी लागण होत असल्याने अखेर बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्याची माहिती दिली आहे.

Related Stories

प्रशिक्षणादरम्यान पाकिस्तानी हवाई दलाचे विमान कोसळले

datta jadhav

द.आफ्रिकेला विजयासाठी 243 धावांची गरज

Patil_p

मॉरिन्हो रोमा संघाचे नवे प्रशिक्षक

Patil_p

जागावाटप प्रक्रियेत ‘अपमान’, काँग्रेस ‘काडीमोड’च्या तयारीत

Patil_p

उत्तरप्रदेश : बस-ट्रक अपघातानंतरच्या आगीत 20 जणांचा मृत्यू ; 21 जखमी

prashant_c

आशा वर्कर्सच्या मानधनात 2 हजार रुपयांची वाढ; अमित ठाकरे व अजित पवार भेट यशस्वी

pradnya p
error: Content is protected !!