तरुण भारत

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे निधन

ऑनलाईन टीम / श्रीनगर :   

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे सोमवारी रात्री उशिरा निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. दिल्लीतील एका रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.  

Advertisements

जगमोहन हे 1984 ते 1989 आणि जानेवारी 1990 ते मे 1990 या काळात ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. ते केंद्रीय शहरी विकास आणि पर्यटन मंत्री म्हणूनही ते काही काळ कार्यरत होते.   

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, जगमोहनजी यांच्या जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. ते अत्यंत कुशल प्रशासक आणि बुद्धिमान व्यक्ती होते. देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी त्यांनी काम केले. त्यांच्या कल्पक धोरणांमुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या परिवाराप्रती मी संवेदना व्यक्त करतो.

Related Stories

दिल्ली निवडणुकीसाठी भाजपची समिती

Patil_p

भारताला लवकरच मिळणार एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली

datta jadhav

देशात 24 तासात 53 हजारहून अधिक रुग्ण; 251 जणांचा मृत्यू

pradnya p

आंध्रप्रदेशात ट्रॅक्टरवर विजेची तार पडून 13 जणांचा मृत्यू

datta jadhav

धारवाडमध्ये कोरोनाचा पहिला बळी

pradnya p

भारतात 89,706 नवे कोरोना रुग्ण; एकूण रूग्णसंख्या 43.70 लाखांवर

datta jadhav
error: Content is protected !!