तरुण भारत

म. ए. समिती सुरू करणार कोविड आयसोलेशन सेंटर

शंभर बेडची होणार व्यवस्था

बेळगाव/ प्रतिनिधी

Advertisements

महाराष्ट्र एकीकरण समिती ही निवडणुकीपुरती मर्यादीत नसून सर्वसामान्यांसाठी कार्य करणारी ही संघटना आहे. सध्या कोरोना संसर्ग झपाटय़ाने वाढत असून, आयसोलेशन, क्वॉरंटाईन स्कीनटेस्ट यासारख्या वैद्यकीय चाचण्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सर्वसामान्यांची सोय व्हावी याकरीता मराठा मंदिर येथे आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच मराठा मंदिर व्यवस्थापनाची संयुक्त बैठक मंगळवारी मराठा मंदिर येथे झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या ऑक्सिजनचा तुटवडा भासत असून, ऑक्सिजन उपलब्ध करून देणे, वेगवेगळय़ा हॉस्पिटल्समध्ये बेड उपलब्ध करून देणे यासाठी अनेक समस्या येत आहेत. त्यातच ज्यांना लक्षणे नाहीत त्यांना आयसोलेशन करण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने म. ए. समितीने आयसोलेशन सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मराठा मंदिर व्यवस्थापनाने हॉल उपलब्ध करून दिला आहे.

या आयसोलेशन सेंटरमध्ये 100 हून अधिक जणांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी लागणारे बेड व इतर वैद्यकीय साहित्य गोळा करण्याचे काम सुरू असून, आठवडय़ाभरात हे आयसोलेशन सेंटर सुरू केले जाणार आहे. यानंतर तालुक्मयाच्या इतर भागातही अशी सेंटर उभी करण्यासाठी विचार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमासाठी जत्तीमठ देवस्थानच्या माध्यमातून 2 लाख 51 हजार रूपयांची देणगी जाहीर करण्यात आली आहे. तसेच दानशूर व्यक्तींनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या बैठकीला म. ए. समितीचे पदाधिकारी, मराठा मंदिरचे पदाधिकारी, तसेच विविध संस्थांचे सदस्य उपस्थित होते.

Related Stories

तिसरे उड्डाणपूल : काँक्रिटीकरणासाठी काम युद्धपातळीवर

Amit Kulkarni

महिलेच्या खून प्रकरणी चौघा जणांना अटक

Patil_p

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमावबंदी

Amit Kulkarni

मोटारसायकलच्या ठोकरीने अनोळखी युवकाचा मृत्यू

Patil_p

वॉर्ड पुनर्रचना करण्यासाठी मनपाकडून हालचाली

Patil_p

इनरव्हील क्लबला उद्या ज्योती पाटील यांची भेट

Amit Kulkarni
error: Content is protected !!