तरुण भारत

45 वर्षापुढील व्यक्ती,कोविड योद्धे लसीकरण केंद्रात जाऊन दुसरा डोस घेऊ शकतात-किशोरी पेडणेकर

मुंबई \ ऑनलाईन टीम

मुंबईतील कोरोना प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहे. महापालिकेकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांची महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, महापालिका लहान मुलांसाठी वार्ड तयार करण्यासाठी जागा शोधत आहे. लहान मुलांसाठी पाळणाघर तयार करण्याचाही प्रयत्न आहे. दिव्यागांसाठी घरात ठेवणं घातक ठरू शकतं. त्यामुळे या सगळ्यांचा विचार केला जात आहे. जागांचा शोध सुरू आहे. 45 वर्षापुढील व्यक्ती आणि पहिल्या फळीतील कोविड योद्धे थेट लसीकरण केंद्रात जाऊन लसीचा दुसरा डोस घेऊ शकतात. अशी 59 केंद्र आहेत. याची प्रत्येक वार्डला माहिती दिली जाणार आहे. प्रत्येक वार्डच्या बाहेर या लसीकरण केंद्रांची माहिती उपलब्ध करून दिली जाईल.

तसेच त्या पुढे म्हणाल्या, दोन तीन गोष्टींमध्येही महापालिकेला लक्ष्य घालावं लागणार आहे. खासदार अरविंद सावंत यांनीही यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. बेघर असलेल्यांचं लसीकरण कसं करणार? तसेच काही काळासाठी आलेले आहेत, पण त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही, अशा घटकांचा विचार होणं आवश्यक आहे आणि त्यांचा विचार महापालिका करत आहे. त्यांची नोंदणी करण्यासंदर्भात विचार केला जात आहे. स्थलांतरित मजुरांची माहिती आहे, त्यातून कार्यवाही केली जाईल. कारण ते लसीकरणापासून वंचित राहिले, तर कोरोना पुन्हा वाढत राहिलं.

Related Stories

इंडिका- ट्रक्टर अपघातात दोघांचा मृत्यू

Patil_p

गांजाचे कलेक्शन सांगोल्यापर्यत, दीड किलो गांजा जप्त,आणखी चार अटकेत

Shankar_P

जिल्हा परिषदेचे पेन्शनर वाऱ्यावर

Shankar_P

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला; कारवर दगडफेक

pradnya p

नंगानाच करणाऱया टोळक्यावर दरोडय़ाचा गुन्हा

Patil_p

सिव्हील जिल्हा कोरोनामुक्त करतंय की, कोराना बाधित करतंय…

Patil_p
error: Content is protected !!