तरुण भारत

बिहारमध्ये 15 मेपर्यंत लॉकडाऊन : मुख्यमंत्री नितीश कुमार यांची घोषणा

ऑनलाईन टीम / पाटणा : 


बिहारमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात वाढत असलेली रुग्ण संख्या लक्षात घेत, सरकारने 15 मे पर्यंत लॉकडाऊन जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली की, बिहारमध्ये 15 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. 

Advertisements


मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, सहयोगी मंत्रीगण आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर बिहारमध्ये सध्यातरी 15 मे पर्यंत लॉकडाऊन जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मागील आठवड्यात संसर्गाचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. लॉकडाऊनबाबत  सविस्तर मार्गदर्शक सूचना व इतर कामांच्या संदर्भात आज आपत्कालीन व्यवस्थापन गटाला सूचना करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. 

  • उच्च न्यायालयाने फटकारले 


कोरोना रुग्णांवर होणाऱ्या उपचारांबाबत सोमवारी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना पाटणा उच्च न्यायालयाने बिहार सरकारला लॉकडाऊन संदर्भात प्रश्न विचारला होता. उच्च न्यायालयाने राज्याच्या महाधिवक्त्यांना राज्य सरकारशी बोलण्यास सांगितले होते. 4 मे पर्यंत लॉकडाउनाबाबत कोणताही निर्णय न घेतल्यास उच्च न्यायालय कठोर निर्णय घेऊ शकते, असेही न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर आज 15 मे पर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. 

Related Stories

गेल्या 10 महिन्यापासून बंद असलेल्या ‘या’ राज्यातील शाळा आजपासून सुरू

pradnya p

सलग चौथ्या दिवशी वाढल्या पेट्रोल – डिझेलच्या किंमती

pradnya p

अयोध्या राम जन्मभूमीचा इतिहासही सुरक्षित राहणार

Patil_p

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

tarunbharat

पीएम केअर फंडाविरोधातील याचिकाकर्त्यांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

datta jadhav

मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत

datta jadhav
error: Content is protected !!