तरुण भारत

कर्नाटक: द्वितीय पीयू परीक्षा पुढे ढकलली

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कर्नाटक सरकारने वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी द्वितीय पीयू बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी दिली आहे.

दरम्यान नवीन तारखांची घोषणा लवकरच होईल,’ अशी माहिती शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी दिली आहे. ‘निराश होऊ नका’ विद्यार्थ्यांना तयारी सुरु ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

“कोविड -१९ प्रकरणांमध्ये वाढ होत असल्यामुळे आम्ही पालक, शिक्षक आणि पीयू महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह विविध भागधारकांशी चर्चा केली आहे. याव्यतिरिक्त, बरेच विद्यार्थी त्यांच्या मूळ गावी परत गेले आहेत. परीक्षेसाठी समन्वय साधण्याची आवश्यकता असणारी अनेक विभागही कोविड कामात व्यस्त आहेत. या सर्व बाबींचा विचार करून आम्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार मंगळवारी म्हणाले. तत्पूर्वी, व्यावहारिक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आणि थिअरी परीक्षा संपल्यानंतर दोन दिवसांनी होणार होती.

“महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, पंजाब यासारख्या अनेक राज्यांनी परीक्षा यापूर्वी तहकूब केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये तर त्यांची तयारी सुरू ठेवावी, ”असे ते म्हणाले.

Advertisements

Related Stories

झारखंड : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई; मास्क न घातल्यास 1 लाख रुपयांचा दंड

pradnya p

महाराष्ट्र : दिवसभरात 3 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

pradnya p

‘नगर प्रशासन’च्या 530 रिक्त जागांवर लवकरच नेमणुका

Amit Kulkarni

सोलापुरात आणखी पाच नवीन कोरोना रुग्ण; संख्या 30 वर

Shankar_P

कोरोनाचा उद्रेक : 34 बळी, जिल्हय़ात 431 पॉझिटिव्ह

Shankar_P

ट्रम्प यांना विषाचे पाकीट पाठवणाऱ्या महिलेस अटक

datta jadhav
error: Content is protected !!