तरुण भारत

राज्यस्तरीय मराठी पाढे पाठांतर स्पर्धा जाहीर; नावनोंदणी सुरु

ऑनलाईन टीम / पुणे : 


महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्याना उत्तेजन देण्यासाठी, गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि चे संचालक मंदार नामजोशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

Advertisements


या स्पर्धेची नावनोंदणी 1 मे 2021 महाराष्ट्र दिनापासून ऑनलाईन सुरू झाली असून ‘अंकनाद ‘ या ॲपद्वारे नावनोंदणी करता येणार आहे.


याबाबत अधिक माहिती देताना मंदार नामजोशी म्हणाले, पाढे पाठांतर स्पर्धेतून मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल. अंकनादच्या संगीतमय पाढ्यांमुळे मुलांचे पाढे सहज ऐकून पाठ होतात. त्याचे परीक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अंकनादतर्फे पाढे पाठांतर स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

ही स्पर्धा जिल्हा पातळी व राज्य पातळीवर घेतली जाईल. ही स्पर्धा मराठी भाषेतून घेतली जााणार असून सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा खुली राहील. 


स्पर्धेचे नियोजन :


जिल्हा पातळी : विद्यार्थ्यानी आपल्या गटानुसार सांगितलेले पाढे म्हणताना व्हिडीओ क्लिप ‘ www.mahaaanknaad.com ‘ वेबसाईटवर पाठवतील. जिल्हास्तरावरील यशस्वी विद्यार्थ्याना त्या त्या गटातील इय त्तेचा अंकनाद सेट बक्षीस देण्यात येईल.


राज्य पातळीवर : जिल्हानिहाय यशस्वी विद्यार्थ्यांना पाढ्यांवर आधारीत गणितीय आकडेमोड यावर परीक्षण करण्यात येईल. 


बालगट (वयोगट – 4 ते 6) पहिली साठी अंक उच्चार 1 ते 100 असा स्पर्धेचा विषय आहे . दुसरी, तिसरी साठी 1ते 10 पाढे, 11 ते 20 पाढे, 21 ते 30 पाढे असा स्पर्धेचा विषय आहे .चौथी, पाचवी साठी पावकी, निमकी असा स्पर्धेचा विषय आहे .सहावी, सातवी साठी पाऊणकी, सवायकी असा स्पर्धेचा विषय आहे .


आठवी, नववी, दहावी साठी दिडकी, अडीचकी, औटकी, एकोत्रे असा स्पर्धेचा विषय आहे. खुला गट मध्ये पावकी, निमकी, पाऊणकी, सवायकी, दिडकी, अडीचकी, औटकी, एकोत्रे असा स्पर्धेचा विषय आहे .

Related Stories

सिव्हीलमध्ये लसीकरणासाठी तुडवातुडवी

Patil_p

सातारा-पंढरपूर बसवर दरोडेखोरांची दगडफेक

Patil_p

बार्शीत 347 पोती तंबाखू सील

triratna

सांगली : बापाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलगा व सुनेवर गुन्हा दाखल

Shankar_P

अजिंक्य सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानवंदना

pradnya p

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू

Patil_p
error: Content is protected !!