तरुण भारत

जेईई मेन 2021 : चौथ्या टप्प्यातील परीक्षा स्थगित!

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


जेईई मेनची चौथ्या टप्प्यात होणारी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. यंदाची परीक्षा चार टप्प्यांमध्ये नियोजित होती. त्यापैकी दोन टप्प्यांमधली परीक्षा पार पडल्या आहेत. तिसऱ्या टप्प्यातली परीक्षाही पुढे ढकलण्यात आली होती आणि आता चौथ्या टप्प्यातली परीक्षाही स्थगित करण्यात आली आहे. 

Advertisements

यंदाच्या वर्षी जेईई मेन ही परीक्षा चार टप्प्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पहिल्या दोन टप्प्यातील परीक्षा झाल्या असून तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा 27, 28 आणि 30  एप्रिल 2021 दरम्यान होणार होती. मात्र, देशातला कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. आता चौथ्या टप्प्यातल्या परीक्षेलाही स्थगिती देण्यात आली आहे. चौथ्या टप्प्यात 24 ते 28 मे 2021 या कालावधीत ही परीक्षा होणार होती. मात्र आता ती स्थगित करण्यात आली आहे. 


नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशात कोरोनाची परिस्थिती भयानक आहे. विद्यार्थी आणि अभिभावक या कोरोनाचे शिकार झाले आहेत. अशा परिस्थितीत परीक्षा घेणे शक्य नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.


जेव्हा कोरोना संसर्गाचे स्थिती सुधारेल त्यानंतर परीक्षेचे नवीन शेड्युल जारी केले जाईल. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पूर्ण वेळ दिला जाईल. यासोबतच विद्यार्थ्यांनी एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर लक्ष ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


दरम्यान, यापूर्वी जेईई मेन 2021 च्या अंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च अशा पहिल्या दोन टप्प्यातील परीक्षा घेण्यात आली आहे. फेब्रुवारीच्या सत्रात 6,20,978 आणि मार्चमध्ये 5,56,248 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. 

Related Stories

सरकारच्या आदेशाशिवाय खाजगी शाळांनी फी वाढवल्यास होणार कारवाई : मनीष सिसोदिया

prashant_c

पैशांपेक्षा महत्त्वाचा कुटुंबीयांचा आनंद

Patil_p

महाराष्ट्र : मागील 24 तासात 161 पोलिसांना कोरोनाची बाधा

pradnya p

गोकुळमध्ये सत्तांतर! सतेज पाटील-मुश्रीफ गटाची 17-4 ने बाजी

triratna

पंपोरमध्ये मशिदीत लपलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

पाक सैन्यांच्या गोळीबारात भारतीय लष्कराचा JCO शहीद

datta jadhav
error: Content is protected !!