तरुण भारत

सांगली : मिरजेत लॉकडाऊनच्या भीतीने बाजार पेठ फुल्ल

खरेदीसाठी झुंबड, सोशल डिस्टनचा भंग

प्रतिनिधी / मिरज

Advertisements

कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी बुधवारपासून आठ दिवस महापालिका क्षेत्रात कडक लॉकडाऊन लागू होणार असल्याने मंगळवारी सकाळी खरेदीसाठी शहरातील सर्वच बाजार पेठांमध्ये गर्दी उसळली.

धान्य, तेल, भाजीपाला, दूध खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी केली होती. लोणी बाजार, सराफ रोड, बोकड चौक, गाडवे चौकाला यात्रेचे स्वरूप आल्याने कोरोना नियमांचा फज्जा उडाला. या गर्दीला पांगवण्यासाठी महापालिका आणि पोलिसांचे पथक रस्त्यावर उतरले होते. मात्र, सकाळी ११ वाजेपर्यंत गर्दी नियंत्रणात आली नाही. ११ नंतरही बाजार पेठांमध्ये गर्दीच होती. काही धान्य आणि तेल दुकानांसमोर सोशल डिस्टनच्या नियमांच्या चिंधड्या उडाल्याने प्रशासनाला कारवाईचा बडगा उगारवा लागला.

Related Stories

राज्य चालविण्याचे कंत्राट शरद पवार यांच्याकडे : चंद्रकांतदादा पाटील

Shankar_P

अख्ख्या गल्लीची चाळण करुनही लिकेज सापडेना!

triratna

सांगली : ग्रामसेवकाच्या अनास्थेमुळे एरंडोली ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

triratna

सांगली : आटपाडी पोलीस ठाण्याला नवी इमारत : प्रस्ताव पाठविण्याचे गृह राज्यमंत्री यांचे निर्देश

triratna

सांगली : बसस्थानकावरील व्यावसायिकांना नाममात्र भाडे आकारणी करा

triratna

क्रांतिकारक जयराम अण्णा कुष्टे यांचे कोरोनाने सांगलीत निधन

triratna
error: Content is protected !!