तरुण भारत

गोकुळमध्ये सत्तांतर! सतेज पाटील-मुश्रीफ गटाची 17-4 ने बाजी

प्रतिनिधी/ कोल्हापूर

राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सत्ताधारी महादेवराव महाडिक आणि पीएन पाटील गटाची 30 वर्षांची सत्ता संपुष्ठात आली. पालकमंत्री सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने या निवडणुकीत बाजी मारली. 21 पैकी केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले. तर विरोधी गटाने 17 जागा जिंकल्या.

Advertisements

या निवडणुकीत विरोधी आघाडीचे अरुणकुमार डोंगळे, अभिजित तायशेटे, विश्वास नारायण पाटील, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगुले, नविद मुश्रीफ, रणजित पाटील, नंदकुमार डेंगे, बाबासाहेब चौगुले, करणसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, एस आर पाटील, बयाजी शेळके, सुजीत मिणचेकर, अमरसिंह पाटील, अंजना रेडेकर हे उमेदवार विजयी झाले. तर सत्ताधारी गटातून अमरीश घाटगे, माजी अध्यक्ष अरुण नरके यांचे चिरंजीव चेतन नरके, शौमिका महाडिक आणि बाळासाहेब खाडे यांनी विजय मिळवला.

दरम्यान, कोल्हापुरातील रमणमळा परिसरात आज सकाळीच मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्यांदा राखीव प्रवर्गांची मतमोजणी झाली. राखीव 5 पैकी 4 जागांवर विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने बाजी मारली. तर शौमिका महाडिक यांच्या रुपाने केवळ एकच जागा सत्ताधारी आघाडीला मिळाली.

Related Stories

भटक्या कुत्र्यांना अँटी रेबीजचा डोस

triratna

जोतिबा दर्शन घेऊन परतताना झालेल्या अपघातात एक ठार

triratna

जगभरात मागील 24 तासात 2.60 लाख नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

सिंगापूरमध्ये लॉक डाऊन जाहीर

prashant_c

कर्नाटक लॉकडाऊन : किराणा दुकानं दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू राहणार

Shankar_P

ज्येष्ठ शिवसैनिकास कोरोनाची बाधा; शिवसेना भवन काही दिवसांसाठी सील

pradnya p
error: Content is protected !!