तरुण भारत

आता हैदराबादमधील 8 सिंहांना कोरोनाची लागण!

  • सर्व सिंह विलगीकरणात असून उपचारांना चांगला प्रतिसाद

ऑनलाईन टीम / हैदराबाद :


हैदराबादमधील नेहरू प्राणिसंग्रहालयातल्या 8 सिंहांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.  सेंटर फॉक सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजीने (CCMB) 29 एप्रिलला प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. त्यांनी RT PCR चाचणीत प्राणिसंग्रहालयातील 8 सिंहांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले होते.

Advertisements


वन्यप्राण्यांची देखभाल करणाऱ्या पशुचिकित्सकांना 24 एप्रिलला या सिंहांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यांना भूख न लागणे, नाकातून पाणी येणे आणि कफ झाल्याचे दिसून आले होते. या प्राणिसंग्रहालयात 12 सिंह आहेत. ते जवळपास 10 वर्षे वयाचे आहेत. या घटनेनंतर नागरिकांसाठी हे प्राणिसंग्रहालय बंद करण्यात आले आहे. 


दरम्यान, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने सांगितलं आहे कि, हैदराबाद प्राणिसंग्रहालयात असलेल्या 8 एशियाटिक सिंहांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ते सिंह विलगीकरणात असून उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत आणि व्यवस्थित खातपीत आहेत.


यापूर्वी न्यूयॉर्कमध्ये गेल्या वर्षी 8 वाघ आणि सिंहांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तसेच हाँगकाँगमध्ये कुत्री आणि मांजरांमध्ये कोरोना व्हायरस आढळून आला होता.

Related Stories

गुजरातमध्ये शेतकऱयांना थ्री-फेज वीज पुरवठा

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येने गाठला 70 लाखांचा टप्पा

datta jadhav

सीबीएसईची दहावी, बारावीची परीक्षा 1 जुलैपासून

pradnya p

उत्पादन क्षेत्राचा 8 वर्षांमधील उच्चांक

Patil_p

दिल्लीत 256 नवे कोरोनाबाधित

pradnya p

कलर टीव्हीच्या आयातीवर केंद्र सरकारकडून बंदी

datta jadhav
error: Content is protected !!