तरुण भारत

रत्नागिरी : मुन्नाभाई ‘आयएएस’अधिकाऱ्याला अटक

जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीची टाकली होती पोस्ट, २४ तासात कोल्हापुरातून मुसक्या आवळल्या

प्रतिनिधी / रत्नागिरी

Advertisements

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली झाल्याची बनावट पोस्ट टाकणाऱ्या संशयिताला सोमवारी रात्री कोल्हापूर येथून अटक करण्यात आली. अर्जून श्यामराव सकपाळ (29, रा. कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांकडून जलद गतीने तपास करत २४ तासात संशयिताच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्जून हा आयएएस अधिकारी असल्याचे गावामध्ये सर्वांना सांगत होता. आपली फेसबुक प्रोफाईल देखील आयएएस अधिकारी असल्याची ठेवली होती. राज्यातील तसेच देशातील आएएस अधिकाऱ्यांचे व्हिडिओ तो समाज माध्यमांमधून पोस्ट करत होता. लोकांची खात्री पटावी यासाठी बदलीची पोस्ट तयार केली होती तथापि याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने अर्जून याचे पितळ उघडे पडले तसेच तो मुन्नाभाई आयएएस अधिकारी असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

Related Stories

वीजबिल माफ करा अन्यथा रक्तकंदन

triratna

धक्कादायक : रत्नागिरीत कोरोनाचे तीन बळी

triratna

कोल्हापूर : ‘कट-ऑफ डेट’चा उद्या फैसला

triratna

जिह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव !

Patil_p

कोल्हापूर : मराठा समाजाला मान्य असा पर्याय काढा

triratna

ऑनडय़ुटी ट्रफिक पोलिसाचे हार्टऍटॅकने निधन

NIKHIL_N
error: Content is protected !!