तरुण भारत

कोकण रेल्वेस्थानक मार्गाची झाली दुरावस्था

प्रतिनिधी / रत्नागिरी

रत्नागिरीतील मुख्य कोकण रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या रस्त्यांची पूर्णत दुरवस्था झाली आहे. दोन पदरी असलेल्या या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. अनेक वर्षांत या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही.

कोकण रेल्वेचे जिल्ह्यातील मुख्य जंक्शन असलेल्या स्थानकाला मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या दोन पदरी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावरून वाहने चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.

ठिकाठिकाणी खड्डे पडलेले असल्यामुळे कोणते खड्डे चुकावाचये हा प्रश्न वाहनचालकांना सतावताना दिसून येतो. पावसात या रस्त्यांवर पाणीच पाणी साचलेले दिसून येते. प्रशासनाकडून या रस्त्यांची डागडुजी कधी होणार हा प्रश्न रेल्वेस्थानकात नियमित येणाऱ्या नागरिकांना पडत आहे.

Advertisements

Related Stories

रत्नागिरी : दापोली विधानसभा राष्ट्रवादी मतदार क्षेत्र सरचिटणीसपदी अमित कदम

triratna

दाऊदच्या मालमत्ता लिलावाची अर्ज प्रक्रिया 6नोव्हेंबरपर्यंत होणार पूर्ण

Patil_p

शिक्षणसेवक पद रद्द करा!

NIKHIL_N

‘गडनदी’चा उजवा कालवा ठेकेदाराच्या फायद्यासाठी!

Patil_p

कोकण किनारपट्टीवर नवा ‘चतुर’

NIKHIL_N

जिल्हा बॅकेला 10 लाख रूपयांचा गंडा

Patil_p
error: Content is protected !!