तरुण भारत

देशी ट्विटर म्हणून ओळख असणारे ‘कू’ ऍप आता स्थानिक भाषांमध्ये

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

देशी ट्विटर अशी ओळख असणारे ‘कू’ ऍपने आता ग्राहकांसाठी नवीन टॉक टू टाईप फिचर सादर केले आहे. या ऍपची अधिकची ओळख ही दिल्लीमधील शेतकरी आंदोलनानंतर झाल्याची माहिती आहे. सध्या ग्राहकांना बोलून आपला मेसेज टाईप करण्याची सुविधा प्राप्त होणार असल्याची माहिती आहे. विशेष बाब म्हणजे सदरचे फिचर हे देशातील सर्व स्थानिक भाषांमध्येही उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.

Advertisements

सदरची नवीन फिचर सादर करण्याप्रसंगी बोलताना ‘कू’चे सहसंस्थापक अप्रमेय राधाकृष्ण यांनी म्हटल्याप्रमाणे टॉक टू टाईप फिचर एका जादूप्रमाणे असल्याचे म्हटले आहे. यामुळे या बदलाचा येत्या काळात ग्राहकांकडून स्विकार केला जाणार असल्याचा विश्वास राधाकृष्ण यांनी व्यक्त केला आहे.

ऍपवर 55 लाख ग्राहक

कू ऍपवर 55 लाखापेक्षा अधिकचे ग्राहक जोडले गेले आहेत. यामुळे या ऍपला मिळणाऱया अधिकच्या पसंतीमुळे कंपनी 10 कोटी ग्राहकांना जोडण्याचे ध्येय ठेवत आपले कार्य करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सात भाषांमध्ये सेवा

सदरचे ऍप हे हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलगू, तामिळ, बंगाली आणि मराठी भाषांमध्येही वापरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. चालू वर्षातील अखेरीपर्यंत ऍपवर एकूण 25 भाषांमध्ये सेवा मिळणार असल्याचेही म्हटले आहे.

Related Stories

आयसीआयसीआय बँकेचा नफा 36 टक्क्मयांनी वाढला

Omkar B

आठवडय़ाचा प्रारंभ तेजीच्या उसळीने

Patil_p

558 अंकांनी मजबूत

Patil_p

सनटेकच्या प्रकल्पांना तिमाहीत दमदार प्रतिसाद

Patil_p

दहा वर्षांमध्ये अमूलाचा व्यवसाय पाच पटीने वाढून 52 हजार कोटींच्या घरात

Omkar B

बाजारात सेन्सेक्स, निफ्टीचा नवा उच्चांक

Patil_p
error: Content is protected !!