तरुण भारत

सांगली : खा. संजयकाका पाटील यांची दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

दिघंची / वार्ताहर

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी खासदार संजयकाका पाटील यांनी दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य केंद्राचा आढावा घेतला.यावेळी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील खासदार संजयकाका पाटील यांनी केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, अनिल पाटील हे उपस्थित होते.

दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्राला शक्य त्या सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत दिघंचीला फॅबी फ्लू गोळ्या व इतर वैद्यकीय साहित्य तात्काळ मिळण्यासाठी सूचना केल्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी यावेळी सांगितले. तर लसीकरण केंद्र व कोविड तपासणी केंद्र वेगळे करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून लसीकरण केंद्र अन्यत्र सुरू करु अशी ग्वाही दिली.

तर तात्काळ दिघंचीसाठी ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. प्रणव गुरव,बंडू मोरे,केशव मिसाळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिघंचीसाठी 25 बेड चे कोविड हॉस्पिटल सुरू करण्याची आग्रही मागणी खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे केली.
यावेळी दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सूरज पवार, डॉ असिफ तांबोळी,जि. प.सदस्य मोहन रणदिवे,यांच्यासह वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

सांगलीतील 143 ग्रामपंचायत निवडणुक यंत्रणा मतदानासाठी सज्ज – जिल्हाधिकारी

Shankar_P

अखेर मिरजकरांना मिळाले शुद्ध पाणी

triratna

सांगली : आटपाडीत तात्काळ १०० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर करा : आमदार गोपीचंद पडळकर

triratna

इस्लामपुरातील ‘आज्या मेहरबान’ टोळीला मोक्का

triratna

सांगली : शड्डू थांबला, मल्ल रोजंदारीवर

triratna

सांगलीत वृत्तपत्र विक्रेत्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन; 15 राज्यातील विक्रेत्यांचा सहभाग

triratna
error: Content is protected !!