तरुण भारत

मागील वर्षभरात मिडकॅपचा मजबूत परतावा

1 वर्षात 86 टक्क्यांचा परतावा – पाच फंड हाऊसमध्ये आयसीआयसीआय प्रूडेंशियल मिडकॅपला फायदा करुन देण्यात आघाडीवर

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

मागील एक वर्षामध्ये म्युच्युअल फंडच्या मिड कॅप योजनेमधील गुंतवणूकदारांना मजबूत फायदा झाला आहे. देशातील पाच मोठय़ा म्युच्युअल फंड हाऊसच्या मिड कॅपने 1 वर्षात 70 टक्क्यांपेक्षा अधिकचा फायदा करुन दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने आयसीआयसीआय प्रूडेंशियलने सर्वाधिक 80 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

टॉपच्या मिडकॅप फंडचा परतावा हा अधिकचा अर्थलाभ देणारा असून आयसीआयसीआय प्रूडेशियल मिड कॅपने वर्षातील परतावा 86.18 टक्के दिला आहे. निप्पॉन इंडियाने 74.16, ऍक्सिस मिड कॅप फंड 57.62 टक्के, कोटक इमर्जिंग इक्विटी फंड 79.86, डीएसपी मिड कॅप 57.40 टक्के आणि एचडीएफसी मिड कॅपच्या ऍपोर्च्युनिटीज फंडने 75.19 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

मिडकॅपमध्ये तेजीचा माहोल

जेव्हा संपत्तीमध्ये अधिकची वाढ होते, तेव्हा मिडकॅप ऐतिहासिक स्वरुपात दीर्घ कालावधीसाठी मजबूत कामगिरीसह सकारात्मक परतावा देत असल्याचेही आयसीआयसीआय प्रूडेंशियल मिड कॅप फंडचे मॅनेजर प्रकाश गौरव यांनी स्पष्ट केले आहे.

फायनान्शिअल आणि हेल्थकेअरवर ध्येय

सध्याच्या पोर्टफोलियोत फायनॅन्शिअल आणि हेल्थकेअरवर ध्येय निश्चित केले आहे. विशेष म्हणजे यामध्ये केमिकल्स, गुड्स, मोबाईल, रिसर्च आणि फार्मा यासारख्या क्षेत्राचा समावेश अधिक राहिला आहे.

Related Stories

ऍपल होणार दोन लाख कोटी ची पहिली कंपनी?

Patil_p

मायक्रोसॉफ्टने दिली कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमची परवानगी

datta jadhav

होंडाच्या सीबीआर-600चे सादरीकरण 21 ऑगस्ट रोजी

Patil_p

चीनकडून अँट समूहावर निर्बंधाचे संकेत

Patil_p

फार्मा उद्योगाला पीएलआय स्कीम लागू

Patil_p

बीएसएनएल 18 हजार कोटींची संपत्ती विकणार

Patil_p
error: Content is protected !!