तरुण भारत

दुसऱया सत्रात सेन्सेक्स 465 अंकांनी घसरला

निफ्टी 14,500 च्या खाली -जागतिक बाजारात सकरात्मक संकेत

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात मंगळवारी जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक कल राहिला होता. परंतु या वातावरणातही बीएसई सेन्सेक्स 465 अंकांनी घसरुन बंद झाला आहे. निर्देशांकात मजबूत स्थिती राखणाऱया कंपन्यांमध्ये प्रामुख्याने रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि इन्फोसिस या कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाल्याची नेंद केली आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये मंगळवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स 465.01 अंकांसह 0.95  टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 48,253.51 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 137.65 अंकांसह 0.94 टक्क्यांनी प्रभावीत होत निर्देशांक 14,496.50 वर बंद झाल्याची नेंद केली आहे.

प्रमुख कंपन्यांपैकी दिवसभरातील कामगिरीनंतर डॉ. रेड्डीज लॅबचे समभाग दोन टक्क्यांनी घसरले असून यासोबतच  रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लि., इन्फोसिस, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि पॉवरग्रिडचे समभाग नुकसानीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांपैकी ओएनजीसी, बजाज फायनान्स, टीसी एस, नेस्ले इंडिया आणि स्टेट बँकेचे समभाग नफा कमाईत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.

देशातील बाजारामध्ये दुपारपर्यंत ट्रेडिंगमध्ये वाढ कायम राहिली नसल्यामुळे देशातील बाजार घसरणीसह बंद झाला आहे. ही स्थिती निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे कोरोना संसर्गाचे वाढती संख्येमुळे पुन्हा गुंतवणूदरांमध्ये चिंतेत वाढ झाल्याचे दिसून आले असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

विक्रीतील दबाव

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना वगळता अन्य सर्व क्षेत्रात विक्रीचा दबाव राहिला होता. औषध कंपन्यांच्या समभागात मोठी सुधारणा होत असल्याचेही पहावयास मिळाले आहे.

कोरोनाची धास्ती कायम

देशातील विविध राज्यांमध्ये दैनदिंनपणे वाढत जाणाऱया कोरोना संसर्गाच्या कारणास्तव सर्वसामान्यांसह अन्य लोकांमध्ये चिंता वाढल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि दिल्लीसह अन्य विभागांमध्ये नवीन संसर्गाची संख्या कमी होत असली तरी कोरोनाची धास्ती कायम असल्याचा सूर विविध स्तरांवरुन निर्माण होत असल्याचे पहावयास मिळत आहे. अन्य बाजारांपैकी हाँगकाँग आणि सोल बाजार तेजीत होते. युरोपमधील प्रमुख बाजारात प्रारंभीच्या ट्रेडिंगमध्ये तेजी कायम राहिली होती.

Related Stories

डिक्सॉन टेक्नॉलॉजीसची बोटसोबत भागीदारी

Patil_p

आता एसएमएसच्या आधारे जीएसटी परतावा

Patil_p

एम.राजेश्वर राव यांची आरबीआय डेप्युटी गव्हर्नरपदी वर्णी

Patil_p

मारुतीची ऑनलाइन कार वित्त सेवा

Patil_p

5 जी डाऊनलोडमध्ये सौदी अरेबिया अव्वल

Patil_p

इ-वे बिलाचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढवला

Patil_p
error: Content is protected !!