तरुण भारत

आमिरसोबत काम करणार नागार्जुनचा पुत्र

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार

आमिर खानने लडाखमध्ये लाल सिंग चड्ढ या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य देखील असल्याचे आता समोर आले आहे. नागा चैतन्य लडाखमध्ये चित्रपटांच्या कलाकारांमध्ये सामील होणार आहे. यापूर्वी या चित्रपटात विजय सेतुपति याला घेण्यात आले होते, पण त्याची जागा आता नागा चैतन्य याने घेतली आहे.

Advertisements

नागा चैतन्य हा दाक्षिणात्य सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुनचा पुत्र आहे. नागार्जुन यांनी केवळ दाक्षिणात्य नव्हे तर बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. चैतन्य देखील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. चैतन्यने 2009 मध्ये सफी या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर चैतन्य अनेक तेलगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये दिसून आला आहे.

नागा चैतन्यची पत्नी समांथा रुथ प्रभू देखील दक्षिणेतील प्रख्यात अभिनेत्री आहे. दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची जोडी प्रेक्षकांना अत्यंत पसंत आहे.

Related Stories

सुबोध झाला ‘भयभीत’

prashant_c

गोष्ट एका पैठणीचीसाठी सायली रमली डबिंगमध्ये

Patil_p

आमिर खानने पहिल्यांदाच सांगितले सोशल मीडिया सोडण्याचे खरे कारण

triratna

दिग्गजांसोबत काम करण्याचा अनुभव समृद्ध करणारा : अमिता कुलकर्णी

datta jadhav

‘सन्नाटा’ झाला शांत ; अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन

triratna

केजीएफ 2 प्रदर्शनावेळी राष्ट्रीय सुटी द्या!

Patil_p
error: Content is protected !!