तरुण भारत

इरफान खान आयकॉनिक- जान्हवी

धडक चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री जान्हवी कपूर आता लोकप्रिय ठरू लागली आहे. धडक, घोस्ट स्टोरीज, गुंजन सक्सेना ः द कारगिल गर्ल, रुही हे तिचे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.

कोरोना निर्बंधांच्या काळात जान्हवी सध्या चित्रपट पाहन असून त्यासंबंधीचे अनुभव इन्स्टाग्रामवर मांडत आहे. जान्हवीने अलिकडेच दिवंगत अभिनेता इरफान खानचा ‘लाइफ इन ए मेट्रो’ हा चित्रपट पाहिला, त्याचे काही व्हिज्युअल तिने स्वतःच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. मागील वर्षी 29 एप्रिल रोजी इरफान यांचे निधन झाले होते.

Advertisements

इरफान खान हे आयकॉनिक असल्याचे जान्हवीने म्हटले आहे. इरफान यांचा इंग्रजी मीडियम हा अखेरचा चित्रपट ठरला. 2018 मध्ये न्यूरोएंडोक्राइन टय़ुमरचे निदान झाल्यावर मागील वर्षी 53 वर्षीय अभिनेत्याचे निधन झाले होते.

 जान्हवीला अलिकडेच रुही चित्रपटात पाहिले गेले होते. चित्रपट आणि तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना पसंत पडली होती. या चित्रपटात राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली होती. जान्हवी कपूर आता गुड लक जेरी या चित्रपटात दिसून येणार आहे. आनंद राय यांच्याकडून निर्मित या चित्रपटातून सिद्धार्थ सेनगुप्ता झळकणार आहे.

Related Stories

स्टार प्रवाहवर आता वेबसिरिजची मेजवानी

Patil_p

ज्युनिअर एनटीआरसोबत झळकणार जान्हवी कपूर

Omkar B

…म्हणून मुंबईतील खटले हिमाचलला हलवा; कंगनाची याचिका

pradnya p

मुक्ता बर्वे पहिल्यांदाच करणार काजोलसोबत काम

triratna

नऊ महिन्यांनंतर वाजणार तिसरी घंटा

Patil_p

24 जानेवारी रोजी वरुण धवन विवाहाच्या बेडीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!