तरुण भारत

बिल गेट्स अन् मेलिंडा विभक्त

27 वर्षांच्या संसारानंतर झाले वेगळे – सामाजिक कार्य एकत्रितपणे करणार

वृत्तसंस्था / सॅन फ्रान्सिस्को

Advertisements

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा यांनी परस्परांपासून विभक्त होण्याची घोषणा केली आहे. दोघांनीही 27 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर घटस्फोटाची घोषणा केली आहे. आम्ही आमचे वैवाहिक संबंध संपुष्टात आणत आहोत. जीवनाच्या पुढील टप्प्यात आम्ही एकत्रित वाटचाल करू शकत नाही. पण लोकांच्या भल्यासाठी स्वतःच्या फौंडेशनसोबत काम करत राहू असे दोघांनी म्हटले आहे.

विचारविनिमय आणि परस्परांशी चर्चा केल्यावर आम्ही आमचे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मागील 27 वर्षांमध्ये आम्ही तीन अपत्यांना लहानाचे मोठे केले आहे. तर आमचे फौंडेशन जगभरातील लोकांचे आरोग्य आणि उत्तम जीवनासाठी काम करते. आम्ही या उद्देशासाठी एकसारखा विचार ठेवून एकत्रित काम करणार असल्याचे बिल आणि मेलिंडा यांनी सोशल मीडियावर प्रसारित संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

1994 मध्ये झाला होता विवाह

बिल गेट्स आणि मेलिंडा सर्वप्रथम 1987 मध्ये परस्परांना भेटले होते. 1994 मध्ये दोघांनी विवाह केला होता. बिल गेट्स यांची गणना जगातील सर्वात धनाढय़ लोकांमध्ये होते. याचबरोबर ते स्वतःच्या सामाजिक कार्यासाठीही ओळखले जातात.

बिल गेट्स यांची पार्श्वभूमी

बिल यांचे पूर्ण नाव विलियम हेन्री गेट्स आहे. वयाच्या 13 व्या वर्षी पहिला सॉफ्टवेअर प्रोग्राम लिहिणाऱया गेट्स यांचा जन्म सिएटल या शहरात 28 ऑक्टोबर 1955 रोजी झाला होता. शालेय शिक्षणादम्यान शाळेचे पेरोल सिस्टीम तयार करणाऱया प्रोग्रामर्सच्या एका समूहाची त्यांनी मदत केली आणि ट्रफ-ओ-डाटा तयार केला. हार्वर्ड विद्यापीठातील शिक्षणादरम्यान पॉल जी. एलन यासारखा मित्र मिळाला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्टचा पाया रचला. इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स कॉर्पोरेशनसाठी एमएस-डीओएस तयार केल्यावर कंपनी लोकप्रिय झाली. 1990 च्या दशकाच्या प्रारंभापर्यंत संगणक क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट किंगमेकर ठरली होती. 1995 मध्ये बिल हे जगातील सर्वात धनाढय़ व्यक्ती ठरले.

Related Stories

युरोपात लसींचा सुकाळ : मान्यतेसाठी कालमर्यादा

Patil_p

नेपाळचा नवीन नकाशा कायम राहणार

datta jadhav

रशियात 7 हजारांहून अधिक नवे रुग्ण

Patil_p

भारताच्या मुत्सद्देगिरीला यश

Patil_p

गरजू देशांना ‘युनिसेफ’ पुरवणार कोरोना लस

datta jadhav

ब्राझील : संक्रमण गतिमान

Patil_p
error: Content is protected !!