तरुण भारत

माद्रीद टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची बार्टी उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ माद्रीद

डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या माद्रीद खुल्या आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या टॉप सीडेड ऍश्ले बार्टीने पोलंडच्या स्वायटेकचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.

Advertisements

ऑस्ट्रेलियाच्या बार्टीने 2019 साली प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर 2020 साली पोलंडच्या इगा स्वायटेकने प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतील या दोन विजेत्यामधील झालेल्या माद्रीद स्पर्धेतील सोमवारच्या सामन्यात बार्टीने स्वायटेकचा 7-5, 6-4 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. बार्टीचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना झेकच्या क्विटोव्हाबरोबर होणार आहे. क्विटोव्हाने यापूर्वी तीनवेळा माद्रीद स्पर्धा जिंकली होती.

सोमवारी झालेल्या अन्य एका सामन्यात झेकच्या क्विटोव्हाने रशियाच्या कुडेरमेटोव्हाचा 6-3, 4-6, 6-4 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. रेड क्लेकोर्टवरील स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या बार्टीने सलग 14 सामने जिंकून आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. बार्टीला सोमवारी विजयासाठी सुमारे 100 मिनिटे झगडावे लागले. झेकच्या क्विटोव्हाने 2011, 2015 आणि 2018 साली माद्रीद टेनिस स्पर्धा जिंकली होती. रशियाच्या कुडेरमेटोव्हाने गेल्या महिन्यात चार्लस्टन येथील स्पर्धा जिंकून डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेतील आपले पहिले विजेतेपद मिळविले होते.

माद्रीद स्पर्धेतील अन्य एका सामन्यात आठव्या मानांकित बेलिंडा बेनसिकने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना जेबॉरचा 7-6 (7-2), 4-3 असा पराभव केला. दुखापतीमुळे जेबॉरने हा सामना अर्धवट सोडला.

माद्रीद स्पर्धेतील पुरूष विभागात बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले. दक्षिण आफ्रिकेच्या लॉईड हॅरीसने डिमिट्रोव्हचा  6-3, 3-6, 7-6 (7-5) असा पराभव करत विजयी सलामी दिली. अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या जॉन इस्नेरने सर्बियाच्या केसमॅनोव्हिकचा 6-4, 7-6 (8-6), कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हने सर्बियाच्या लेजोव्हिकचा 6-1, 6-3 असा पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. स्पेनचा नवोदित टेनिसपटू कार्लोस अलकॅरेझचा बुधवारी या स्पर्धेतील दुसऱया फेरीतील सामना स्पेनच्या टॉप सीडेड राफेल नदालशी होणार आहे. अलकॅरेझने फ्रान्सच्या मॅनेरिनोचा 6-4, 6-0 असा पराभव करून दुसऱया फेरीत स्थान मिळविले आहे तर नदालला या स्पर्धेत पहिल्या फेरीत पुढेचाल देण्यात आली आहे.

Related Stories

फेलिसियानो लोपेझ उपांत्यपूर्व फेरीत,

Patil_p

अँजेलो मॅथ्यूजचे लंकन संघात पुनरागमन

Patil_p

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला आर्थिक फटका

Patil_p

ऑलिम्पिकसाठी भारताचा महिला हॉकी संघ जाहीर

Amit Kulkarni

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी विक्रमी 600 हून अधिक अर्ज

Patil_p

लंकेची पहिल्या डावात सावध सुरुवात

Patil_p
error: Content is protected !!