तरुण भारत

नव्या कोरोना रुग्णसंख्येत घट

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

सोमवार संध्याकाळ ते मंगळवार संध्याकाळ या 24 तासांच्या कालावधीत देशभरात एकंदर 3 लाख 57 हजार 229 नव्या रूग्णांची भर पडली आहे. मात्र ही संख्या गेल्या चार दिवसांमधील सर्वात कमी आहे. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याचे सुचिन्ह दिसत असले तरी दक्षतेत कोठेही ढिलाई दाखवणे परवडण्यासारखे नाही, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.

Advertisements

भारतातील 10 राज्यांमध्ये एकंदर 71 टक्के रुग्ण आहेत. बाधितांचे प्रमाण चाचण्यांच्या प्रमाणाच्या 21.47 टक्के आहे. महाराष्ट्र आजही नव्या रूग्णसंख्येत आघाडीवर असून त्यापाठोपाठ कर्नाटकाचा क्रमांक आहे. गुजरात, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात नव्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात ओसरल्याचे दिसत आहे.

सध्या भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या 34 लाख 47 हजार 133 इतकी आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत 33 हजार 491 जणांची भर पडली. कोरोनामुळे होणाऱया मृत्यूंचे प्रमाण बाधितांच्या प्रमाणाच्या 1.1 टक्का आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकंदर 3,449 जणांचा मृत्यू झाला.

हैदराबादमध्ये सिंहांना कोरोना

हैदराबाद येथील प्राणीसंग्रहालयातील 8 सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. असा प्रकार भारतात प्रथमच घडला असून त्यामुळे नवी चिंता निर्माण झाली आहे. या सिंहाच्या लाळेची चाचणी केली असता त्यातून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या सिंहांना ताप येत असून त्यांची भूकही मंदावली असल्याचे येथील व्यवस्थापकांनी स्पष्ट केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आंध्रात नवा घातक कोरोना

आंध्र प्रदेशात कोरोनाचे नवे अधिक घातक रूप समोर आले आहे. त्याचे नाव ‘एपी स्ट्रेन’ असे ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा हे नवे रूप पंधरा पट अधिक घातक असल्याचे आढळले आहे. याची लागण झाल्यास अवघ्या चार दिवसांमध्ये रुग्णाची प्रकृती खालावते व त्याच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी झपाटय़ाने कमी होते, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. आंध्रातील कर्नूळ जिल्हय़ात हे नवे रूप आढळल्याचे स्पष्ट करण्यात आले. याचा अधिक अभ्यास सुरू आहे. हे नवे रूप अधिक वेगाने पसरते असेही संशोधनांअंती दिसून आले आहे.

Related Stories

30 हजार डॉक्टर स्वयंसेवेसाठी तयार

Patil_p

‘सीएए’ला तत्काळ स्थगिती नाही

Patil_p

लपविलेल्या स्फोटकांचा त्वरित त्वरित शोध

Patil_p

ख्रिसमस-नववर्षावर ओमिक्रॉनचे सावट

Patil_p

कर्नाटकात ओमिक्रॉनचा तिसरा रुग्ण

Patil_p

आंदोलक महिला शेतकऱ्यांना ट्रकने चिरडलं

Abhijeet Shinde
error: Content is protected !!