तरुण भारत

कोरोना नियंत्रणाची जबाबदारी पालकमंत्र्यावर

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय – महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकारही जिल्हा पालकमंत्र्यांना

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisements

जिल्हय़ांत कमतरता असलेल्या ऑक्सिजन, बेड, रेमडेसिवीर आणि इतर आवश्यक गोष्टींची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी जिल्हा पालकमंत्र्यांवर सोपविली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली असून प्रत्येक जिल्हा पालकमंत्र्यांनीच संबंधित जिल्हय़ांमध्ये जाऊन तेथील समस्या सोडविण्याचे काम करावे, अशी सूचना दिली आहे. तसेच कोविड नियंत्रणासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार पालकमंत्र्यांना दिले आहेत.

चामराजनगर येथील ऑक्सिजनअभावी 24 रुग्णांचा मृत्यू झालेल्या घटनेनंतर येडियुराप्पा यांनी आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांना कोरोना नियंत्रणासंबंधी दिलेल्या सर्व जबाबदाऱया काढून घेतल्या. त्यामुळे डॉ. सुधाकर यांच्याकडे केवळ आरोग्य खातेच राहिले आहे. आता मंत्री जगदीश शेट्टर यांच्याकडे ऑक्सिजनसंबंधीची जबाबदारी तर उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांच्यावर औषध नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली. शिवाय सरकारी, खासगी इस्पितळांमधील बेडची व्यवस्था पाहण्यासंबंधीची जबाबदारी मंत्री आर. अशोक आणि गृहमंत्री बसवराज बोम्माई यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर कोविड वॉर रुमची जबाबदारी अरविंद लिंबावळी यांच्याकडे देण्यात आली आहे.

अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱया अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची आणि प्रंटलाईन वर्कर्सची कोविड रुग्णांच्या उपचारासाठी नेमण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे चामराजनगर येथील जिल्हा इस्पितळात ऑक्सिजन अभावी रुग्णांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून यासंबंधी तपास करून तील दिवसांत अहवाल सादर करण्यासाठी आयएएस अधिकारी शिवयोगी कळसद यांची नेमणूक करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

अलिकडेच महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू ओसरत आहे. राज्यातही महाराष्ट्राच्या धर्तीवर उपाययोजना करण्यात येणार आहे. कोरोना नियंत्रणासाठी डॉक्टर, नर्स व आघाडीच्या फळीतील कोविड वॉरियर्सना कोविड केअर सेंटरमध्ये नेमणूक करण्यात येईल. जिंदाल कंपनीकडून पुरवठा होणाऱया ऑक्सिजनचा वापर करण्यासाठी अलिकडेच केंद्र सरकारशी चर्चा करण्यात आली आहे, अशी माहितीही येडियुराप्पा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

कोरोना कर्फ्यू 12 मे पर्यंत सुरु राहणार

राज्यात कोरोना नियंत्रणासाठी जारी करण्यात आलेला कोरोना कर्फ्यू यापूर्वीच्या घोषणेप्रमाणे 12 मेपर्यंत जारी राहणार आहे. याचा कालावधी वाढवावा की आणखी कठोर नियम जारी करावेत, याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन जारी करण्याचा प्रस्ताव सरकापुढे नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिले आहे. राज्यात कोरोना कर्फ्यू जारी करून देखील कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन जारी करणार नाही. 12 मे पर्यंत सध्या जारी असणारा कर्फ्यू लागू असणार आहे. प्रत्येक जिल्हा पालकमंत्र्यांनी संबंधित जिल्हय़ाची जबाबदारी सांभाळावी. राज्यात आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

त्रकार प्रंटलाईन वर्कर्स ः मोफत लस

कर्नाटक श्रमिक पत्रकार संघटनेच्या विनंतीची मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दखल घेतली असून पत्रकारांना कोविड प्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करण्यात आले आहे. मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पत्रकारांना मोफत लस दिली जाणार आहे. पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱयांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पत्रकारांना कोविड प्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करण्याचे आश्वासन दिले होते.

Related Stories

बेंगळूरमध्ये १२,३२५ सक्रिय कंटेनमेंट झोन

triratna

कर्नाटक: केसीईटीचा निकाल २० ऑगस्टला

Shankar_P

भाजपच्या दोन मंत्र्यांची निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी

Shankar_P

मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पूर परिस्थितीची दिली माहिती

triratna

कर्नाटकात १२ दिवसांत एक लाख नवीन रूग्ण

Shankar_P

नवीन विजयनगरसाठी मुख्यमंत्र्यांनी पाणी, पाटबंधारे प्रकल्पांची केली पायाभरणी

Shankar_P
error: Content is protected !!