तरुण भारत

पीसीबीकडून हाफीजला मध्यवर्ती करारची ऑफर

वृत्तसंस्था/ कराची

पाकचा ज्येष्ठ फलंदाज मोहम्मद हाफीजला पाक क्रिकेट मंडळाकडून (पीसीबी) मध्यवर्ती कराराची नवी ऑफर देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी मोहम्मद हाफीजने पीसीबीच्या अल्प कालावधीसाठीचा मध्यवर्ती करार स्वीकारण्यास नकार दिला होता.

Advertisements

गेल्या वर्षीच्या मे महिन्यात पीसीबीने पाकच्या क्रिकेटपटूबरोबर मध्यवर्ती करार केला होता. करार केलेल्या यादीमध्ये वहाब रियाझ, शोएब मलिक, मोहम्मद अमीर यांचा समावेश होता पण पाकच्या 40 वर्षीय मोहम्मद हाफीजला पीसीबीने या मध्यवर्ती करारासाठी वगळले होते. चालू वर्षांच्या प्रारंभी पीसीबीकडून मोहम्मद हाफीजवर कमी कालावधीसाठी मध्यवर्ती करार करण्यास  दडपण आणले होते पण हाफीजला मध्यवर्ती करारासाठी क गटात स्थान दिल्याने त्याने नकार दिला होता. आता 1 जुलै रोजी पीसीबीकडून मोहम्मद हाफीज या ज्येष्ठ क्रिकेटपटूला नव्या मध्यवर्ती कराराची ऑफर मिळाली असल्याचे समजते. नव्या मध्यवर्ती करारासाठी शोएब मलिक, वहाब रियाझ आणि हॅरीस सोहेल यांना मात्र वगळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पीसीबीच्या क्रिकेट समितीची बैठक लवकरच होणार आहे. या बैठकीत प्रमुख प्रशिक्षक तसेच प्रशिक्षक वर्गातील इतर सदस्य आणि राष्ट्रीय संघाच्या कर्णधाराच्या नियुक्तीबाबत चर्चा केली जाणार आहे. पीसीबीच्या पाक क्रिकेटपटूंच्या मध्यवर्ती कराराची मुदत येत्या जूनअखेर संपणार आहे.

पीसीबीच्या या नव्या मध्यवर्ती करारासाठी मोहम्मद हाफीजला ऑफर देण्याची शक्यता असून पाकचा माजी कर्णधार अझहर अली याला या आगामी मध्यवर्ती करारामध्ये अ गटातून ब गटात स्थान दिले जाईल, असे सांगण्यात आले आहे. कामगिरीत सातत्य राखणाऱया हसन अली, फईम अश्रफ यांना या नव्या मध्यवर्ती करारामध्ये संधी दिली जाणार असून उस्मान शिनवारी, इफ्तीकार अहमद यांना वगळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यष्टीरक्षक आणि फलंदाज मोहम्मद रिझवान अ श्रेणीतील आपले स्थान राखण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्यावर्षीच्या मे महिन्यात पीसीबीने 18 क्रिकेटपटूबरोबर मध्यवर्ती करार केला होता. या क्रिकेटपटूंना तीन श्रेणीमध्ये विभागण्यात आले होते. पीसीबीकडून या नव्या मध्यवर्ती करारानंतर पाकच्या क्रिकेटपटूंना त्यांच्या श्रेणीनुसार मासिक 1.1 दशलक्ष ते पाच लाखापर्यंत मानधन दिले जाते. त्याशिवाय या क्रिकेटपटूंना सामना मानधन व बोनसची जादा रक्कम मिळते.

2020-21 च्या कालावधीकरिता पीसीबीच्या मध्यवर्ती कराराचे स्वरूप पुढीलप्रमाणे- कॅटेगरी ए+ 10 खेळाडू प्रत्येकी मासिक दीड लाख रूपये मानधन

कॅटेगरी ए 38 खेळाडू प्रत्येकी मासिक 85 हजार रूपये मानधन

कॅटेगरी बी 48 खेळाडू प्रत्येकी मासिक 75 हजार रूपये मानधन

कॅटेगरी सी 72 खेळाडू प्रत्येकी मासिक 65 हजार रूपये मानधन

कॅटेगरी डी 24 खेळाडू प्रत्येकी मासिक 40 हजार रूपये मानधन.

Related Stories

बायर्न म्युनिचच्या विजयात लेवान्डोवस्कीचे दोन गोल

Patil_p

आयसीसी वर्ल्डकपसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पात्र

Patil_p

मुंबईचे फलंदाज पुन्हा ढेपाळले

Patil_p

मिताली राज ‘दस हजारी’ मनसबदार

Patil_p

रूबलेव्ह-कोरिक यांच्यात अंतिम लढत

Patil_p
error: Content is protected !!