तरुण भारत

माराडोना यांच्यावरील उपचारांबद्दल साशंकता

ब्युनोस आयर्स / वृत्तसंस्था

महान फुटबॉलपटू दिएगो माराडोना यांच्या मृत्यूबाबत वैद्यकीय अहवाल प्रॉसिक्यूटर्सकडे प्रदान केला गेला असून या अहवालात, माराडोना यांच्यावर जीवाचा धोका असताना देखील त्याकडे दुर्लक्ष केले गेले. वेळीच योग्य उपचार झाले असते तर माराडोना अद्याप हयात असते, असे नमूद केले गेले आहे. 20 डॉक्टरांनी मागील दोन महिने संशोधन करुन हा अहवाल तयार केला आहे. अर्जेन्टिनाला 1986 मध्ये विश्वचषक जिंकून देणारे दिएगो माराडोना हे महान फुटबॉलपटूंपैकी एक मानले जातात.

Advertisements

ब्रेन सर्जन लिओपोल्डो ल्यूक्यू आणि सायकिऍट्रिस्ट ऑगस्टिना कोसॅशोव्ह यांच्यासह एकूण 7 जणांच्या पथकावर उपचारात दिरंगाई केल्याचा ठपका आहे. 60 वर्षीय माराडोना यांचे भाडेतत्वावरील राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. त्यापूर्वी त्यांचे ब्रेन ऑपरेशनही झाले होते. माराडोना यांना ड्रग्ज व अल्कोहोलच्या सेवनामुळे अनेक विकारांचा सामना करावा लागला असल्याचे या अहवालात पुढे नमूद आहे.

Related Stories

बोपण्णा-माराच उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

जसप्रित बुमराहचे शुभमंगल लवकरच…

Patil_p

पोलंडचा हुरकाझ विजेता

Patil_p

भारतीयानी मोदींच्या सल्ल्याचा गंभीरपणे विचार करावा : पनेसर

Omkar B

चेन्नई सुपरकिंग्स सलग तिसऱयांदा पराभूत

Patil_p

पी.हरिकृष्णचा कार्लसनवर सनसनाटी विजय

Patil_p
error: Content is protected !!