तरुण भारत

प्रो हॉकी लीग – भारताचे युरोपमधील सामने लांबणीवर

वृत्तसंस्था/ लॉसेन

एफआयएच प्रो हॉकी लीगमधील भारताचे स्पेन व जर्मनीविरुद्धचे युरोपमधील सामने लांबणीवर टाकण्यात आले आहेत. भारतात कोरोनाचा महाप्रकोप वाढतच चालला असून अनेक देशांनी भारतातून येणाऱया प्रवाशांवर बंदी घातली आहे, त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे एफआयएचने मंगळवारी सांगितले.

Advertisements

भारताचा पुरुष हॉकी संघ स्पेनविरुद्ध 15 व 16 मे रोजी तर जर्मनीविरुद्ध 23 व 24 मे रोजी सामने खेळणार होता. याआधी ब्रिटनमध्ये होणारे सामनेही याच कारणास्तव लांबणीवर टाकण्यात आले आहेत. ‘एफआयएच, हॉकी इंडिया व जर्मनी, स्पेन, ग्रेट ब्रिटनच्या राष्ट्रीय हॉकी संघटना सर्व मिळून सदर सामने पुन्हा केव्हा आयोजित करता येतील, याचा पर्याय शोधत आहोत,’ असे आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने सांगितले. ‘जागतिक हॉकी समुदायाच्या वतीने भारतीय हॉकी समुदाय, त्यांचे कुटुंबीय व मित्र परिवारांना आमचे पूर्ण समर्थन व सहानुभूती व्यक्त करीत आहोत. हॉकीचा इतिहास व हॉकीचा विकास या भारताशी निगडित आहेत. भारत सध्या अतिशय कठीण काळातून जात असून सर्व भारतवासीयांना आमचा पाठिंबा आहे,’ असेही त्यात म्हटले आहे.

गेल्या महिन्यात हॉकी प्रो लीगमधील ग्रेट ब्रिटनविरुद्धचे सामने लांबणीवर टाकण्यात आले होते. हे सामने लंडनमध्ये 8 व 9 मे रोजी होणार होते. इंग्लंडने हवाई वाहतूक बंदीच्या यादीत भारताचाही समावेश केल्याने एफआयएचला हा निर्णय घ्यावा लागला होता. भारतात कोरोनाने प्रचंड उच्छाद मांडला असून रोज सुमारे 3000 हून अधिक बळी जात आहेत. त्यामुळे आस्ट्रेलिया, मलेशिया, जर्मनी, सिंगापूर, न्यूझीलंड, युनायटेड किंगडम यासह अनेक देशांनी हवाई प्रवासबंदी जाहीर केली आहे. या लीगमध्ये भारताने 8 सामन्यात 15 गुण घेत चौथे स्थान मिळविले असून नेदरलँड्स, जर्मनी व बेल्जियम अनुक्रमे तिसऱया, दुसऱया व पहिल्या स्थानावर आहेत.

Related Stories

ओसाकाचे आव्हान दुसऱया फेरीत समाप्त

Patil_p

हैदराबाद एफसी-बेंगलोर एफसी लढत गोलशून्य बरोबरीत

Patil_p

ऑस्ट्रेलियातील क्रिकेट क्लबच्या प्रशिक्षकपदी सनथ जयसूर्या

Patil_p

कॅनडाची बुचार्ड तिसऱया फेरीत

Patil_p

सायबर हल्ल्याने मँचेस्टर युनायटेडला धक्का

Patil_p

लाहिरीला पदक जिंकण्यासाठी चमत्काराची प्रतीक्षा

Patil_p
error: Content is protected !!