तरुण भारत

माया-लेकींनी केली कोरोनावर मात

प्रतिनिधी/ सातारा

गत वर्षी जिह्यात दाखल झालेल्या कोरोनाची धास्ती वाढत आहे. चालु वर्षी दुसऱया लाटेत अनेक जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. हा विळखा फक्त मृत्यूच्या तोंडी नेत नसून कोरोनाशी लढण्याची ताकद ही देत आहे. असाच कोरोनाशी लढा देणाऱया वाई च्या कन्या शाळेतील संगीत शिक्षिका वर्षा जोशी यांचा अनुभव चांगला मार्गदर्शक ठरत आहे. त्यांनी कोरोनाशी दिलेला लढा त्यांच्या शब्दांतून त्यांनी सांगितला आहे.

Advertisements

माझी आई मीरा वासुदेव वेदरकर ही 78 वयाची आहे. आईला कोरोना झाल्याने संपूर्ण घरावर काळजीचे सावट पसरले. या वयात ती कोरोनाचा सामना कसा करणार असा प्रश्न आमच्या समोर उभा होताच. आईंच्या संपर्कात आल्याने कुटुंबातील सर्वच सदस्यांनी कोरोनाची चाचणी केली. यावेळी सर्वांचे रिपोर्ट पॅझिटिव्ह आले. ही बाब अत्यंत धकादायक होती. नक्की कोणाला सावरायचे आणि कोणी कोणाला मदत मागायची हे कळत नव्हते. कोरोनाची दुसरी लाटेत ऑक्सिजन, बेडची कमतरता, रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा, मृत्यूचे वाढते प्रमाण अशा बातम्या वाचून मन सुन्न झाले होते. स्वताःपेक्षा आईची व कटुंबाची काळजी जास्त वाटत होती.

यावेळी मी एचआरसीटी टेस्ट केली. तेव्हा माझा स्कोर 8 होता. आता माझे वय 53 आहे. अनेक वर्षापासून मला मधुमेहाचा त्रास आहे. तसेच आई पेक्षा माझी प्रकृती चिंताजनक होती. यामुळे आम्हाला दवाखान्यात दाखल होणे हा एकच पर्याय समोर दिसत होता. मी आणि आई सिम्बॉयसेस हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. दाखल होताच उपचार सुरू झाले. उपचारावेळी डॉक्टरांकडून, नर्स तसेच कर्मचाऱयाकडून काळजी घेतली जात होती. मात्र मनात धास्ती कायम होती. ही धास्ती मोडून काढण्यासाठी मी सकारात्मक विचार करत होते. कारण जो पर्यंत आपले विचार सकारात्मक होत नाहीत. तो पर्यंत आपल्या मनावरचा ताण कमी होत नाही. ताण कमी झाला की, कोरोनाशी दोन हात करायला आणखी बळ मिळते. हे मी सकारात्मक विचार ठेवून करू शकले. माझा बरोबरच आई ही कोरोनाशी लढा देत होती. माझ्या पेक्षा आईचे वय जास्त होते. मात्र आम्ही कोरोनावर मात करणारच हा एकाच विश्वास आमच्या माया लेकींमध्ये होता. तो विश्वास आम्ही अवघ्या 12 दिवसात सिद्ध करून दाखवला. आज कोरोना हा शब्द ऐकला तरी सगळे टेंशनमध्ये येतात. पण माझ्या अनुभवावरून एकच सांगते की, तुमची योग्य उपचार पद्धती, पोषक आहार, नियमांचे पालन आणि विशांती यामुळे तुम्ही कोरोनावर नक्की मात करू शकतो. माझ्यासोबत पती व मुलगा यांना लक्षणे होती. ती सौम्य असल्याने ते होम आयसोलेट होते. यावेळी योग्य पद्धतीने त्यांनीही उपचार घेतले तसेच सर्व नियम पाळले. यामुळे त्यांनीही कोरोनावर यशस्वीरित्या मात केली.

Related Stories

शेतकऱ्यांनो सोयाबीन विकू नका – राजू शेट्टी

Sumit Tambekar

साताऱ्यात 78 बेडची उभारणी

datta jadhav

पोहायला गेलेल्या युवकाचा बंधाऱयात बुडून मृत्यू

Patil_p

मराठा आरक्षणासाठी नववर्षात रणशिंग फुंकणार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : वारणा समूहातील जेष्ठ कार्यकर्ते विष्णू बच्चे यांचे निधन

Abhijeet Shinde

नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओला भीषण आग

Rohan_P
error: Content is protected !!