तरुण भारत

मत्रेवाडी येथे युवकाचा गळा आवळून खून

प्रतिनिधी/ ढेबेवाडी

मत्रेवाडी (ता. पाटण) गावच्या हद्दीत युवकाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. मयत युवकाची एका महिलेशी जवळीकता होती. त्यामुळे अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्या महिलेच्या पती व दिराने मारहाण व गळा आवळून खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.

Advertisements

    याबाबत ढेबेवाडीचे साहाय्यक फौजदार शिवाजी अंकुशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अविनाश शंकर कोळेकर (वय 20, रा. कोळेकरवाडी, ता. पाटण. सध्या रा. मत्रेवाडी) याची गावातीलच एका 35 वर्षीय महिलेशी जवळीकता आहे, असा संशय तिच्या पतीला होता. 2 मे रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मत्रेवाडी गावच्या हद्दीत भांगा नावाच्या शिवारात आबांच्या झाडाखाली मयत अविनाश व संबंधित महिला गप्पा मारत बसलेले असताना महिलेचा पती व दीर  तिथे आले. त्यांनी अविनाशला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व गळा आवळून खून केला. 

     ही घटना 3 मे रोजी उघडकीस आली. मयत म्हणून पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली होती. मयताचे उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन केले असता गळा आवळून मृत्यू  झाला असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी पायातील सँडल, एक मोबाईल, टॉवेल, तुटलेले बटन, महिलेचा केसात वापरण्याचा बो असे साहित्य मिळून आले होते. पोलिसांनी कसून चौकशी करून घडलेली घटनेचा छडा लावला. अविनाश कोळेकरच्या खून प्रकरणी दोघांना अटक केली. 4 मे रोजी त्यांना पाटण येथे न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील यांनी भेट दिली. साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार तपास करत आहेत.

Related Stories

सांगली : जखमी मोराला वाचवण्यात वनविभागाला यश

Abhijeet Shinde

कोल्हापूर : संस्थात्मक विलिगिकरणासाठी गेलेल्या कुटुंबास रिसॉर्ट मालकाने केली शिवीगाळ

Abhijeet Shinde

कोरोना : महाराष्ट्रात मागील 24 तासात 9,350 नवे रुग्ण; 15,176 डिस्चार्ज!

Rohan_P

महाराष्ट्रातील कोरोना : मागील 24 तासात 4,505 नवे रूग्ण, 68 मृत्यू

Rohan_P

कोरोनाविरुध्द एकजुटीने लढा द्या

Patil_p

दहावी, बारावी परीक्षेबाबत संभ्रमावस्था

Abhijeet Shinde
error: Content is protected !!