तरुण भारत

बदलीच्या फेक मेसेजप्रकरणी मुन्नाभाई ‘आयएएस’ला अटक

जिल्हाधिकाऱयांच्या बदलीची खोटी पोस्ट, – 24 तासात कोल्हापुरात आवळल्या मुसक्या

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली झाल्याची बनावट पोस्ट टाकणाऱया संशयिताला सोमवारी रात्री कोल्हापूर येथून अटक करण्यात आली आहे. अर्जुन शामराव सकपाळ (29, कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आह़े गुन्हा दाखल झाल्यानंतर जलदगतीने तपास करत 24 तासात शहर पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत..

  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन हा आयएएस अधिकारी असल्याचे गावामध्ये सर्वांना सांगत होत़ा आपली फेसबुक प्रोफाईल देखील त्याने आयएएस अधिकारी असल्याची ठेवली होत़ी राज्यातील तसेच देशातील आयएएस अधिकाऱयांचे व्हिडीओ तो समाज माध्यमांमधून पोस्ट करत होत़ा लोकांची खात्री पटावी, यासाठी बदलीची पोस्ट तयार केली होत़ी तथापि या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने अर्जून याचे पितळ उघडे पडल़े पोलिसांच्या तपासात तो मुन्नाभाई आयएएस असल्याचेही समोर आल़े

राज्यातील आयएएस अधिकाऱयांच्या बदल्या झाल्याची पोस्ट सोमवारी व्हॉटसऍप या समाजमाध्यमावर व्हायरल झाली होत़ी यामध्ये रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांचे देखील नाव होत़े या प्रकाराने जिल्हा प्रशासनामध्ये खळबळ उडाल़ी प्रशासनाकडून कोकण आयुक्तालयाशी संपर्क साधण्यात आल़ा त्यामध्ये अशी कोणतीही बदली करण्यात आलेली नसून संबंधित पोस्ट बनावट असल्याचे कोकण आयुक्तालयाकडून जिल्हा प्रशासनाला सांगण्यात आल़े  बनावट पोस्ट व्हायरल करण्याची जिल्हा प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आल़ी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शहर पोलिसांत अज्ञाताविरूद्ध तक्रार दाखल केली होत़ी त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध भादंवि कलम 465 व 469 प्रमाणे गुन्हा दाखल केल़ा संशयिताला अटक करण्यासाठी पोलीस उपनिरिक्षक वांगणेकर यांच्याकडे तपास सोपवण्यात आला होता. पोलिसांच्या सायबर सेलकडून ही बनावट पोस्ट टाकणाऱयाची माहिती घेण्यात आल़ी

शहर पोलिसांच्या तपासामध्ये ही पोस्ट कोल्हापूर येथून पोस्ट झाल्याचे समोर आल़े त्यानुसार पोलिसांच्या पथकाने अर्जुन याचा शोध घेत कोल्हापूर येथून त्याच्या मुसक्या आवळल्य़ा गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासात संशयिताला अटक झाल्याने पोलिसांचे कौतुक करण्यात येत आह़े पोलिसांकडून अर्जुन याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अर्जुन याने यापूर्वी अशा प्रकारे बनावट पोस्ट अथवा अन्य कोणाची फसवणूक केली आहे का, यासंदर्भात पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आह़े

Related Stories

आदर्श शाळा पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार ऑनलाईन

Patil_p

कोकणवासियांसाठी गोकुळचे ताजे दूध

triratna

जिल्हा परिषद आरोग्य विभागावर सत्ताधाऱयांचेच ताशेरे

Patil_p

भारताला वाऱयावर सोडाल तर अडचणीत याल!

Patil_p

चिपळुणात एकाच कुटुंबातील तिघांचा धरणात बुडून मृत्यू

Omkar B

जिल्हय़ात रात्रीची संचारबंदी लागू

NIKHIL_N
error: Content is protected !!