तरुण भारत

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल – डिझेलच्या किंमतीत वाढ !

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


पेट्रोलियम कंपन्यांनी  सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यानुसार, आज पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर 19 पैशांनी वाढ झाली. डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 21 पैशांनी वाढ झाली आहे.

Advertisements

मंगळवारी मुंबईत पेट्रोलचा दर 96.95 रुपये तर डिझेल 87.98 रुपये प्रति लिटर इतके होते. तर आज सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाल्यावर मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 97.12 रुपये तर डिझेल 88.19 रुपये इतके झाले आहे. 

  • महाराष्ट्रात पेट्रोल- डिझेलचा आजचा दर

पुणे : पेट्रोल- 96.76, डिझेल 86.50

नाशिक : पेट्रोल- 97.52, डिझेल 87.24

औरंगाबाद : पेट्रोल- 98.35, डिझेल 89.43

  • अन्य राज्यात आजचे दर


दिल्लीत पेट्रोल 90.74 रुपये तर पेट्रोल 81.12 रुपये इतके झाले आहे. चेन्नई पेट्रोल 92.70 रुपये तर डिझेल 86.09 इतके आहे. आणि कोलकातामध्ये  पेट्रोल 90.92 रुपये तर डिझेल 83.98 रुपये इतके वाढले आहे. 

  • मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये पेट्रोल 100 पार 


राजस्थानच्या श्रीनगरमध्ये एक लिटर पेट्रोल 101.43 रुपये मिळत आहे. तर डिझेल 93.54 रुपये प्रति लिटर इतके आहे. तर मध्यप्रदेशच्या अनुपनगरमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली असून येथे प्रति लिटर पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 101.15 आणि 91.96 रुपये इतके झाले आहे. 

  • दररोज 6 वाजता किंमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.


Related Stories

मेक इन इंडियाला अमेझॉनचा हातभार

Patil_p

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

triratna

उद्योगधंदे सुरू करण्यास सशर्त अनुमती

Patil_p

एक कोरोनामुक्त गाव

Amit Kulkarni

राष्ट्रीय महामार्गावर 20 एप्रिल पासून सुरु होणार टोलवसुली

prashant_c

मुलीच्या जन्मानंतर गावात संचारते ‘नवचैतन्य’

Patil_p
error: Content is protected !!