तरुण भारत

म्हापशातील रंगकर्मी रंजन मयेकर यांचे कोविडमुळे निधन

प्रतिनिधी / म्हापसा

म्हापशातील ज्येष्ट नाटय़कर्मी, नाटय़दिग्दर्शक, सामाजिक संस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ता , निवृत्त बँक कर्मचारी व हॉटेल व्यावसायिक असलेले शेटय़?वाडा धुळेर म्हापसा येथील रंजन चंद्रकांत मयेकर यांचे वयाच्या 62व्या वषी कोरोनाच्या संसर्गामुळे राहत्या घरी आज मंगळवारी दि 4 रोजी सकाळी निधन झाले.

Advertisements

दत्तवाडी येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले त्याचे पुत्र आर्यन यांनी त्यांना मंत्राग्नि दिली. त्याच्या मागे पत्नी, कन्या, पुत्र, विवाहित 5 भाऊ व विवाहित दोन बहिणी असा परिवार आहे. रंजन चंद्रकांत मयेकर हे उत्कृष्ट नाटय़ कलाकार होते . कला अकादमी व विद्या निकेतन मडगाव या संस्था मार्फेत होणाऱया राज्य पातळीवरील नाटकामध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. अनेक वेळा उत्कृष्ट अभिनय म्हणून त्याचा गौरव झाला होता. राष्ट्रोळी प्रासादिक नाटक मंडळी जुना बाजार या संस्थेचे ते अध्यक्ष होते. जनता हायस्कुल माजी विद्यार्थी संघटनेचे माजी उपाध्यक्ष होते. शेटय़ वाडा येथील राष्ट्रोळी देवस्थानचे माजी पदाधिकारी म्हणून काम पाहिले, सिंडिकेट बॅकेचे निवृत्त कर्मचारी होते, कला व गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे कँटीन ते चालवत असे. विविध सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी कार्य केले आहे. म. गो. पक्षाचे ते निष्ठावान कार्यकर्ते होते.

Related Stories

अंगणवाडी शिक्षिका लता गावकर यांच्या बदलीच्या निषेधार्थ वाळपईत काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने

Omkar B

मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी गोव्याचा संघ जाहीर

Amit Kulkarni

संजीवनी कारखाना लवकरात लवकर सुरू करा

Patil_p

आयएसएल शील्डसाठी आज ओडिशाविरुद्धचा सामना मुंबईसाठी महत्त्वाचा

Amit Kulkarni

सोनसडय़ावर 50 टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्यास पालिका राजी

Patil_p

काणकोणची परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका

Patil_p
error: Content is protected !!