तरुण भारत

साखळीत आजपासून मर्यादित काळासाठीच दुकाने खुली

सकाळी 6 ते दु. 12 पर्यंतच जिवनावश्यक सामानांची दुकानेखुली : साखळीत कोरोना बाधीतांची संख्या वाढतच असल्याने निर्णय.

डिचोली/प्रतिनिधी

Advertisements

साखळीत दररोज कोरोन संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने साखळी नगरपालिका क्षेत्रात आजपासून आठ दिवस कडक निर्बंधांसह लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. सकाळी 6 ते दु. 12 यावेळेत साखळी नगरपालिका क्षेत्रातील केवळ जिवनावश्यक सामानांची दुकाने सहकारी संस्था खुली राहणार. तर त्यानंतर सर्व दुकाने बंद ठेवली जाणार आहे. दिवसभर केवळ औषधालये, पेट्रोल पंप, राष्ट्रीयीकृत बँका खुली राहणार आहेत. साखळी नगरपालिकेने लागू केलेल्या या लॉकडाऊनची सर्वांनी कडकपणे अंमलबजावणी करावी. या लॉकडाऊनचे नियम मोडल्यास व्यापारी परवाना मागे घेतला जाणार, असा इशारा नगराध्यक्ष राया विनायक  पार्सेकर यांनी दिला आहे.

डिचोली नगरपालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेस माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक धर्मेश सगलानी, राजेश सावळ यांची उपस्थिती होती. साखळीत सध्या झपाटय़ाने वाढत चाललेली कोरोना रूग्णांची संख्या आटोक्मयात आणण्यासाठी साखळी नगरपालिकेने लावलेल्या कडक निर्बंधांचे पालन करावे. सध्याची परिस्थिती भयानक असल्याने सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी घरातच रहावे, असे आवाहन नगराध्यक्ष राया पार्सेकर यांनी केले.

“जिव असल्यास भिक मागून खाईन” अशी परिस्थिती – धर्मेश सगलानी.

सध्या राज्यातील कोवीड परिस्थिती पाहता “जिव असल्यास भिक मागून खाईन” अशी परिस्थिती सर्वत्र निर्माण झाली आहे. साखळीतील परिस्थिती सध्या हाताबाहेर जाण्याच्या स्थितीत असताना साखळी नगरपालिकेने पुकारलेल्या लॉकडाऊनला सर्वांनी सहकार्य करावे. आम्हला लोकांची काळजी असून लोकांची सुरक्षा हि आमची जबाबदारी आहे. सध्या सरकारकडे कोवीड रूग्णांना सांभाळणसाठी व्यवस्थाच नाही. इस्पितळांमध्ये खाटा, प्राणवायू नाहीत. रूग्णवाहिका वेळेवर दाखल होत नाहीत. अशा परिस्थितीत या परिस्थितीशी लोकांनी कशी झुंज द्यावी ? असा सवाल नगरसेवक धर्मेश सगलानी यांनी केला. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपने सर्वत्र टिका उत्सव करून लोकांना लसी दिल्या व बरीच प्रसिध्दी मिळविली. आज त्याच भाजपने खाटा, प्राणवायू मिळवून देण्यासाठी उत्सव आयोजित करून लोकांचे प्राण वाचवावे. केंद्र सरकारने जाहिर केल्याप्रमाणे 18 ते 45 वर्षांवरील लोकांना लस उपलब्ध होत नाही. तर खासगी इस्पितळांमध्ये पैशां?नी लस उपलब्ध होते. याला काय म्हणावे. सरकाराज लोकांच्या काळजीपोटी लस उपलब्ध करून देऊ शकत नाही. सरकारने या सर्व विषयांवर विचार करताना केंद्र सरकारतर्फे आलेले 300 कोटी आज राज्यावर आलेल्या या आपत्कालीन परिस्थितीत खर्च करावे, असे यावेळी धर्मेश सगलानी यांनी म्हटले.

पूर्वसूचना कोवीड दुसरी लाट हाताळण्यास सरकार फोल – राजेश सावळ.

देशभरात आणि राज्यात गेल्या वषी आलेल्या पहिल्या कोवीड लाटेतून आपली काळजी घेताना लोकांनी त्या लाटेतून आपला बचाव करण्यात लोक यशस्वी ठरले होते. त्यानंतर सर्वत्र दुसरी आणि भयानक लाट येणार अशी पूर्वसूचना सरकारला आणि जनतेलाही देण्यात आली होती. त्य दृष्टीने सरकारने तयर असायला हवे होते. मात्र सरकार आज हि परिस्थिती हाताळण्यास अक्षरशः फोल ठरले आहे. सरकारने कोणतीच व्यवस्था न करता आपला सुस्तपणा आणि बेजबाबदारपणा दाखवून दिला आहे. याचा आज राज्यातील लोकांनी लिचार करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे साखळी नगरपालिका क्षेत्रातील आजपर्यंत जे कोरोना बाधीत रूग्ण बरे झालेले आहेत. त्यांनी आपल्याजवळ असलेले ऑक्समीटर व इतर सामान साखळी नगरपालिकेकडे जमा करावे. जेणेकरून सदर आवश्यक सामान आज कोरोनाबाधीत रूग्णांना पुरविणे शक्मय होईल. तसेच सध्या या महामारीच्या काळात सर्व नगरसेवक, पंचसदस्य हे कोवीड योध्दे म्हणून वावरत असल्याने त्यांना.कोवीड योध्दे म्हणून मान्यता देणे आवश्यक आहे. यासंदर्भात आपण जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यां?च्याशी बोलणी केली आहे. त्यांनीही सदर बाब मान्य केली असून सर्वांना आता कोरोना योध्दे म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदर प्रमाणपत्रे मिळवून सर्व पंचसदस्य, नगरसेवकांनी आपले लसीकरण करून घ्यावे, असे नगरसेवक राजेश सावळ यांनी सांगितले.

Related Stories

कचरा प्रकल्प होऊ देणार नाही

Patil_p

विदेशातील पर्यटन प्रचारावर 33 कोटींची उधळपट्टी

Amit Kulkarni

फोंडा तालुका पहिल्या दिवशी पूर्ण लॉकडाऊन

Omkar B

आपतर्फे आजपासून विज आंदोलन

Patil_p

सोमवारी 423 कोरोनामुक्त, 391 नवे रुग्ण

Patil_p

युवा काँग्रेसतर्फे बिल्डकाँम कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा

Patil_p
error: Content is protected !!