तरुण भारत

नाहक फिरणाऱयांची आता दंडऐवजी कोरोना टेस्ट ?

क्लोजडाऊनच्या आठव्या दिवशीही शहरात पसरला शुकशुकाट : मुख्य रस्त्यावर मात्र वाहनांची गर्दी

वार्ताहर / खानापूर

Advertisements

खानापूर तालुक्मयात क्मलोजडाऊनच्या आठव्या दिवशीही दिवसभर शुकशुकाट पसरला होता. तालुक्मयात दररोज कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तालुका प्रशासनानेही कंबर कसली आहे. बाहेरून येणाऱयांवर करडी नजर ठेवली जात आहे. गावागावात होणारी गर्दी यावर नजर ठेवण्यासाठी ग्राम पंचायतीला सूचना दिल्या आहेत. खानापूर शहरात नगरपंचायतीने प्रत्येक वॉर्डात घरोघरी नागरिकांच्या आरोग्याची विचारफूस करण्यासाठी मोहीम राबवली आहे. आरोग्य खात्याने लसीकरणाबरोबर कोरोना टेस्टसाठी मोहीम राबवली आहे. तर इकडे पोलीस प्रशासनानेही खानापूर शहरात नियमावलीचे पालन न करता नाहक गर्दी करणाऱयांना चांगल्याच डोस देण्याचा सपाटा लावला आहे. दुपारी बारानंतर खानापूर शहराच्या परिसरात नाहक गर्दी करून फिरणाऱया लोकांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. दंडात्मक कारवाई करण्यासाठी पोलिसांनी आपली लाठी उगारली आहे. पण आता लाठी काठीने उपयोग होणार नाही, यापेक्षा नाहक फिरणाऱयांची आता कोरोना टेस्ट करणे योग्य असा पवित्रा पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे खानापूर शहर परिसरात नाहक फिरणाऱयांना ताब्यात घेऊन त्यांची कोरोना टेस्ट करण्यावर भर दिल्याने शहराच्या दिशेने फिरणाऱयांची गर्दी आता रोडावताना दिसत
आहे. खानापूर तालुका पोलीस प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी कंबर कसली आहे. पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी यांच्या मार्गसूचीनुसार खानापूर तसेच नंदगड पोलीस स्थानकात जागृती मोहीम तसेच नाहक करणाऱयांवर करडी नजर ठेवली आहे. खानापूर पोलीस उपनिरीक्षक बसगौडा पाटील यांनी गेल्या दोन दिवसात खानापूर शहरात नाहक फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई केली. आतापर्यंत खानापूर तालुक्मयात जवळपास 800 जणांवर दंडात्मक कारवाई करून 80 हजाराचा दंड वसूल केला आहे. हा दंड वसूल करूनही अनेकजण याकडे कानाडोळा करून नाहक फिरताना दिसत आहेत. त्यामुळे आता दंडात्मक कारवाई तसेच लाठी काठीची कारवाई करण्यापेक्षा नाहक फिरणाऱयांची कोरोना टेस्ट करुनच सोडण्यावर भर दिला
आहे.

कठोर कारवाईचे आदेश

राज्य शासनाने दि. 4 मे पर्यंत क्लोजडाऊनची नियमावली जाहीर करून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू करण्यासाठी मुभा दिली. दुपारी बारानंतर संपूर्ण क्लोजडाऊन करून गर्दीवर नियंत्रण आणण्याचे आदेश देण्यात आले. पुन्हा आता जिल्हाधिकाऱयांनी सदर नियमावली बारापर्यंत राबवण्यासाठी आदेश दिले असून जनता कर्फ्यूसाठी निर्बंध लादले आहेत. त्यामुळे नाहक गर्दी अथवा नियमांचे पालन न करणाऱयांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही बजावले आहेत. त्यामुळे खानापूर पोलीस आणि शहर परिसरात फेरफटका मारून गर्दीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला
आहे. नंदगड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उस्मान आवटी यांनीही नंदगड भागात कडक निर्बंध लादून नाहक फिरणाऱयांवर करडी नजर ठेवली आहे. खानापूर शहरात स्थानिक लोक वगळता खेडय़ापाडय़ातील लोकांची गर्दी रोडावली आहे. शहराच्या भागातून जाणाऱया राष्ट्रीय महामार्गावर दिवसभरात वाहनांची गर्दी अल्प प्रमाणात दिसून येत होती. खेडय़ातील लोकांची संख्याही शहराच्या दिशेने कमी प्रमाणात होती. क्लोजडाऊनच्या आठव्या दिवशीही खानापूर शहर परिसरात शुकशुकाट पसरला होता.

कोरोना टेस्टच्या भीतीने गर्दी रोडावली

गेल्या दोन दिवसात सात-आठ लोकांची कोरोना टेस्ट केल्याने त्या लोकांना आता धडकी भरली आहे. खानापूर शहरात फिरताना आपलीही कोरोना टेस्ट होईल, अशी भीती अनेक युवकांमध्ये निर्माण झाल्याने खानापूर शहराच्या दिशेने गर्दी रोडावली आहे.

Related Stories

रोटरी क्लबतर्फे स्वच्छता जागृती कार्यक्रम

Amit Kulkarni

आमच्याकडे लस उपलब्ध नाही, तुम्ही उद्या या !

Omkar B

बसवेश्वर पुतळा बसविण्याबाबत उद्या बैठक

Patil_p

हुतात्मा दिनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हा

Patil_p

शहरात मतदान जनजागृती रॅली

Patil_p

अल्पवयीन मुलीचा खून करणाऱया नराधमांना फाशी द्या

Patil_p
error: Content is protected !!