तरुण भारत

मराठा आरक्षण रद्द; खासदार संभाजीराजेंनी सांगितला पर्याय

कोल्हापूर/प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी पूर्वीच्या फडणवीस सरकारप्रमाणे ठाकरे सरकारनेही सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यामुळे कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही. नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करतो. मात्र, आता काहीतरी मार्ग काढण्याची गरज असल्याचे खासादार संभाजीराजे यांनी म्हटले आहे. तसेच संभाजीराजे यांनी एक पर्याय देखील सांगितला आहे.

Advertisements

आता केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित प्रयत्न करण्याची गरज नाही. तुर्तास मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये जास्तीच्या जागा मिळण्यासाठी सुपर न्युमररी हाच एकमेव पर्याय दिसत आहे. त्यासाठी राज्य सरकारला कोणत्याही परवानगीची गरज लागणार नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने सुपर न्युमररी सूत्राचा वापर करून शैक्षणिक संस्थांमधील जागा वाढवाव्यात, असे संभीजीराजे यांनी सांगितले.

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.. मराठा आरक्षण रद्द; खासदार संभाजीराजे यांनी सांगितला दुसरा पर्याय

दरम्यान, संभाजीराजे यांनी सध्याची कोरोनाची भयानक स्थिती पाहता मराठा समाजाचा उद्रेक होणे योग्य ठरणार नाही. आरक्षण घेण्यासाठी आधी आपण जिवंत राहिले पाहिजे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत मराठा समाजाने कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही संभीजीराजे यांनी केले.

Related Stories

मोटारसायकल घसरली, हसूर दुमालाचे पती पत्नी गंभीर जखमी

triratna

नागपूरमध्ये दिवसभरात 74 मृत्यू; 5,813 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

पुणे विभागात 14,445 रुग्ण कोरोनामुक्त

Rohan_P

मंत्रालयात दारूच्या बाटल्या! या प्रकरणाची चौकशी व्हावी; प्रवीण दरेकर यांची मागणी

Rohan_P

गोकुळ शिरगावमध्ये सापडला पॉझिटिव्ह रुग्ण

triratna

तरुण भारत इफेक्ट : पुलाची शिरोली येथील नागरिकांची आर्थिक लूट थांबली

triratna
error: Content is protected !!