तरुण भारत

मराठा समाज महाविकास आघाडीला माफ करणार नाही : चंद्रकांत पाटील

ऑनलाईन टीम

मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारची पूर्वतयारी, इच्छाशक्ती आणि समन्वय नव्हता. त्यामुळेच उच्च न्यायालयात टिकलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही, असा घणाघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केला आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील मराठा समाज महाविकास आघाडी सरकारला माफ करणार नाही, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर बोलताना केवळ वकिलांची तगडी फौज देऊन उपयोग नाही. आरक्षण प्रश्नात राज्यातील सत्ताधाऱ्यांची भूमिका महत्त्वाची होती, असेही पाटील यांनी म्हटले आहे. मराठा समाजाने यावर काय प्रतिक्रिया द्यायचे हे त्यांनीच ठरवावे. तसेच राज्य सरकारने आता पुढे काय निर्णय घ्यायचा हे ठरवावे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

मागासवर्गाचा अहवाल कसा योग्य आहे, हे आपण उच्च न्यायालयात सांगू शकलो. मात्र, आपले वकील सर्वोच्च न्यायालयात सांगू शकले नाहीत, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मराठा समाजाशी महाराष्ट्रातील सरकारने द्रोह केला असून त्यांना मराठा समाज माफ करणार नाही, असे पाटील म्हणाले.

Related Stories

पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर खोचक टीका; म्हणाले…

Rohan_P

दिल्लीत दिवसभरात 1808 नवे कोरोना रुग्ण; 20 मृत्यू

Rohan_P

1 मार्च ते 14 एप्रिल दरम्यान राज्यात ‘कृषी ऊर्जा पर्व’

Rohan_P

दुचाकी व कंटेनर अपघातात नरवेली येथील विद्यार्थी गंभीर जखमी

tarunbharat

राधानगरीतून 1400 तर अलमट्टीतून 31922 क्युसेक विसर्ग,102 बंधारे पाण्याखाली

Abhijeet Shinde

साताऱयात मुली का संतापल्या

Patil_p
error: Content is protected !!