तरुण भारत

जिल्ह्यात भाजपाची निदर्शने


प्रतिनिधी / सातारा : 

पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे. महिलांच्यावर अमानुषपणे बलात्कार करुन हत्या केल्या जात आहेत. त्या गुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भाजपाच्यावतीने सातारा जिह्यात आंदोलन करण्यात आले.  

Advertisements

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन झाले. या आंदोलनात आमदार शिवेंद्रराजे भोसले, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, गणेश पालखे यांच्यासह सहभागी झाले होते.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरु केला असून भाजपाच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण सुरु आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायांना आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपाचे कार्यकर्ते कोरोनाचे नियम पाळून आंदोलन करत आहे. या आंदोलनाची आणि निषेधाची दखल घेवून केंद्र सरकारपर्यंत आमच्या भावना पोहचवाव्यात आणि पश्चिम बंगालमधील दंगेखोर आणि अत्याचार करणाऱयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.  

वाई प्रांत कार्यालयाबाहेर निदर्शने  

वाई प्रांत कार्यालयाबाहेर निदर्शने करुन वाईच्या प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. या आंदोलनात सातारा जिल्हा सरचिटणीस सचिन घाटगे, सातारा जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस यशराज भोसले, जिल्हा चिटणीस यशवंत लेले, वाई शहर अध्यक्ष राकेश फुले, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस अमोल भोसले, काशिनाथ शेलार उपस्थित होते. 

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. राजकीय हिंसाचार सुरू आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे. त्याच्या वाई तालुका व वाई शहर भाजपच्या वतीने निषेध करत आहोत तसेच पश्चिम बंगाल सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

छ.उदयनराजेंनी केली ऐतिहासिक गोलबाग विकास कामाची पाहणी

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्यात 855 नागरिकांना दिला डिस्चार्ज

Abhijeet Shinde

सातारा : कास – जुंगटी रस्ता खचला ; वाहतुक ठप्प गावांचा संपर्क तुटला

Abhijeet Shinde

पुणे मिरज लोंढा रेल्वे दुहेरीकरण, विद्युतीकरणगतीने

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्यात काल तब्बल ९४ रुग्णांची वाढ

Abhijeet Shinde

स्व. यशवंतराव चव्हाण स्मारक सभागृहासाठी 7 कोटी 69 लाखाचा निधी मंजूर

Amit Kulkarni
error: Content is protected !!